स्पेनमध्ये दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, इसिसनं स्वीकारली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 10:37 PM2017-08-17T22:37:48+5:302017-08-19T01:18:32+5:30
स्पेनमधील बार्सिलोना शहरात भरधाव कार जमावामध्ये अचानक घुसल्यानं चिरडून 13 जणांचा मृत्यू असून अनेक जण जखमी झाले आहे.
बार्सिलोना, दि. 17 - स्पेनमधील बार्सिलोना शहराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी लास रॅमब्लास या गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वाहनानं अनेकांना चिरडल्यानंतर अंदाधुंद गोळीबारही केला आहे. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून, 100हून अधिक लोक जखमी आहेत. वाहनाच्या धडकेत अनेक जण गंभीररीत्या जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्पेन पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर दहशतवादाविरोधात आम्ही स्पेनसोबत असल्याचं विधान इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी केलं आहे. स्पेनमध्ये दुसरा होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला. कॅम्ब्रिल्स बंदराजवळ पोलिसांना गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावर न उतरण्याचा इशारा दिला. स्पेनचे पंतप्रधान मारियानो रखॉय यांनी 'जिहादी हल्ला' असा करार दिला आहे. तत्पूर्वी युरोपिय देशात अनेकदा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झालेत. फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देश अशा हल्ल्यांनी हादरले आहेत. स्पेनच्या राजघराण्यानं या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. देश अतिरेक्यांच्या दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असं विधान स्पेनच्या राजघराण्यानं केलं आहे.
स्पेन पोलिसांच्या माहितीनुसार, दुस-या होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला. कॅम्ब्रिल्स बंदराजवळ पोलिसांना गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावर न उतरण्याचा इशारा दिला आहे. स्पेनमध्ये झालेल्या दुस-या दहशतवादी हल्ल्यात 6 नागरिक जखमी झाले असून, एक पोलीस जखमी आहे, असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये पदपथावर अनेक जण उपस्थित असतानाच एक व्हॅनने काही लोकांना चिरडलं आहे. अचानक झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानं सिटी सेंटरच्या बाहेर रस्त्यावर लोकांची तारांबळ उडाली आणि रस्त्यावर लोक अस्ताव्यस्त पळत सुटले. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून, ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत.
स्पेनच्या सरकारी वृत्तसंस्थेने या घटनेचा एक फोटो प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये तीन जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसत आहे. बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढऱ्या व्हॅनने पदपथावरून चालणाऱ्या काही जणांना चिरडले. ही घटना भयावह असल्याचे पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे. यानंतर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने लास रॅमब्लासमधील प्लाका काटालुनिया भागात न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. याशिवाय जवळचे मेट्रो आणि रेल्वे स्थानक बंद करण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनने पदपथावरील लोकांना चिरडल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले दोन जण त्याच भागातील एका हॉटेलमध्ये शिरले. या दोघांकडे हत्यारे असल्याचे वृत्तदेखील रॉयटर्सने दिले आहे.
At least 13 dead in van crash in #Barcelona city centre - Cadena SER radio, citing police sources pic.twitter.com/nOjJqZEOM5
— Reuters India (@ReutersIndia) August 17, 2017
Two armed men have entered a restaurant in #Barcelona after van crash: local media https://t.co/PcWnUJmwDnpic.twitter.com/5OBtquZnG9
— Reuters India (@ReutersIndia) August 17, 2017