प्रशांत महासागराच्या मधोमध शास्त्रज्ञांना सापडलं अज्ञात शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 03:23 PM2017-11-07T15:23:48+5:302017-11-07T15:36:25+5:30

समुद्राच्या अगदी मधोमध असलेलं हे शहर पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात निर्माण झालं असावं असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

An unknown city found in the middle of the Pacific Ocean | प्रशांत महासागराच्या मधोमध शास्त्रज्ञांना सापडलं अज्ञात शहर

प्रशांत महासागराच्या मधोमध शास्त्रज्ञांना सापडलं अज्ञात शहर

Next
ठळक मुद्देत्याचप्रमाणे या शहराला भुताने झपाटलेलं असल्याचीही चर्चा आहे.जॉर्ज कौरोनिस या आर्कियोलॉजिस्टने हे शहर शोधून काढलं आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हे शहर इथे अस्तित्वात असल्याचा दावा शास्त्रज्ञ करत आहेत.

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हापासून रोज नवनव्या गोष्टी समोर येतात. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात लपलेली अनेक शहरं आजही अज्ञातवासात आहेत. शास्त्रज्ञ, अभ्यासक या शहरांचा शोध लावत आहेत. अशाच एका शहराचा शोध आर्कियोलॉजिस्टने लावला आहे. समुद्राच्या अगदी मधोमध असलेलं शहर पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात निर्माण झालं असावं असा दावा त्यांनी केला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी समुद्राच्या आड लपलेल्या शहराचा शोध लावला आहे. 

प्रशांत महासागराच्या मध्यावर हे एक छोटंसं शहर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे शहर शोधून काढलं असून प्रशांत महासागरातील माइक्रोनेशिया आईलैंड्स पोंहपेईजवळ हे शहर सापडलंय. गेल्या अनेक वर्षांपासून हे शहर इथे अस्तित्वात असल्याचा दावा शास्त्रज्ञ करत असून झाडांच्या पानांवर हे शहर पाण्यात तरंगत असल्याचाही दावा करण्यात आलेला आहे. तसंच सॅटेलाईटद्वारे टिपण्यात आलेल्या दृष्यानुसार या शहरात २५ फूट उंच आणि १७ फूट जाड भिंतीही बांधण्यात आल्या आहेत.

जॉर्ज कौरोनिस या आर्कियोलॉजिस्टने हे शहर शोधून काढलं आहे, मात्र इतर नागरिव्यवस्थेपासून हे शहर एवढ्या लांब कसं काय राहू शकतं याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येतय. तसंच या शहराची तुलना अटलांटिक शहराशीही केला जातेय. या शहराला नॅन मडोल (समुद्राच्या मधोमध) म्हणतात. जॉर्ज कौरोनिस म्हणतात की, या शहारत जवळपास १०० आईसलँड्स असून त्या एकाच प्रकारच्या आकाराप्रमाणे आहेत. सॅटलाईटच्या आधारे घेतलेल्या फोटोतून असं दिसतंय की, हे शहर अगदी समुद्राच्या मधोमध असल्याने तिकडे सध्यातरी जाणे फार अवघड आहे.

लॉस अँजिलोसपासून २५०० किमी आणि ऑस्ट्रेलियापासून १६०० किमी लांब आहे. शास्त्रज्ञांच्या मते हे शहर पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात निर्माण झालेलं असावं. त्याचप्रमाणे या शहराला भुताने झपाटलेलं असल्याचीही चर्चा आहे. म्हणून जगभरातून या शहराला आता हॉन्टेड सिटी म्हणूनही ओळखलंय जातंय.

Web Title: An unknown city found in the middle of the Pacific Ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.