Video - मसूद अजहरप्रकरणी लवकरच तोडगा काढू, चीनची भारताला ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 03:39 PM2019-03-17T15:39:17+5:302019-03-17T15:42:24+5:30
मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला.
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. व्हिटो पावरचा वापर करुन चीननेमसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला. त्यामुळे चीनच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली. मात्र आता चीनने मसूद अजहर प्रकरणावर लवकरच तोडगा काढू, या प्रस्तावाला आम्ही विरोध केला नसून आम्ही यावर चर्चा करत आहोत असं सांगितले.
भारतामधील चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी सांगितले की, मसूद अजहर प्रकरण चीन लवकर तोडगा काढेल, हे प्रकरण तांत्रिक आहे आणि आम्ही मसूज अजहर प्रकरणावर चर्चा करत आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरच हे प्रकरण सोडवणार आहे. मसूद अजहरबाबत भारताकडून व्यक्त होत असलेली चिंता आम्हाला माहिती आहे असं त्यांनी सांगितले.
Chinese Ambassador to India Luo Zhaohui to ANI: Regarding Masood Azhar we fully understand and we fully believe this matter. We understand India’s concerns and are optimistic this matter will be resolved.
— ANI (@ANI) March 17, 2019
संयुक्त राष्ट्र संघात चीनने घेतलेल्या भूमिकेवर भारत, अमेरिकेसह अनेक देशांनी नाराजी दाखवली. चीन जर या प्रकरणावर गंभीरतेने विचार करत नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल असं अमेरिकेने सांगितले होते. चीनचे म्हणणं आहे की, मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला होता. चीनने स्वत: च्या व्हिटो पावरचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं होतं, फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अजहरच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला होता. 2017 सालीही चीनने अशाप्रकारे प्रस्तावाला विरोध केला होता. गेल्या 10 वर्षातील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा हा चौथा प्रस्ताव आहे
अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद
अनेक वर्षापासून भारत संयुक्त राष्ट्र परिषदेत जैशसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जैशच्या संस्थापकावर बंदी आणली जात नाही. अजहर पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत बहावलपूरमध्ये वास्तव्य करतो. जानेवारी 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेवर बंदी आणण्यसाठी जोरदार हालचाली सुरु ठेवल्या होत्या. यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला मात्र चीनने विरोध केला होता.
पाहा व्हिडीओ