जीनांच्या मृत बहिणीस पाठवले लाखो रुपयांचे पाण्याचे बिल
By admin | Published: July 1, 2014 02:18 AM2014-07-01T02:18:45+5:302014-07-01T02:18:45+5:30
पाकिस्तानी अधिका:यांनी देशाचे संस्थापक मुहंमद अली जीना यांच्या बहिणीकडे त्यांच्या मृत्यूनंतर 47 वर्षानी लाखो रुपयांचे पाण्याचे बिल पाठविले आहे.
Next
>कराची : पाकिस्तानी अधिका:यांनी देशाचे संस्थापक मुहंमद अली जीना यांच्या बहिणीकडे त्यांच्या मृत्यूनंतर 47 वर्षानी लाखो रुपयांचे पाण्याचे बिल पाठविले आहे.
फातिमा जीना यांना 2 लाख 63 हजार 774 रुपयांचे पाण्याचे बिल कराचीच्या जल व सांडपाणी मंडळाने पाठविले असून ते 1क् दिवसांच्या आत फेडावे अन्यथा त्यांच्या घराचे पाणी व सांडपाणी व्यवस्था तोडली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. कराचीच्या कायद्यानुसार ही मालमत्ता जप्त करता येत नाही, तसेच तिचा लिलाव करता येत नाही वा दंडही लावता येत नाही, असे या वृत्तात म्हटले आहे.
या नोटिसीनुसार पैसे देण्याची अंतिम तारीख 28 मे होती. बिल न देण्याची कोणतीही कारणो ऐकून घेतली जाणार नाहीत, असेही या अधिका:यांनी बजावले आहे. या बिलावरील पत्ता आर ए 241 कँटोनमेंट असा आहे. ही मालमत्ता जीना यांची असून, तिथे सध्या वस्तुसंग्रहालय आहे. जीना व त्यांची बहीण फातिमा यांच्या वापरात असलेल्या वस्तू तिथे ठेवण्यात आल्या आहेत. जीना यांनी मार्च 1944 मध्ये फ्लॅग स्टाफ हाऊस ही इमारत 1.15 लाख रुपयांना विकत घेतली होती. 1948 सप्टेंबरमध्ये फातिमा तेथे राहण्यास गेल्या व 1964 र्पयत तेथे राहिल्या. 1965 मध्ये निवडणूक हरल्यानंतर त्या या घरात राहिल्या नाहीत. 1967 साली त्यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)
4कराचीच्या जल व सांडपाणी मंडळाने फातिमा यांच्या नावावर पाठवलेली ही नोटीस परत घ्यावी अशा
सूचना आपण अधिका:यांना दिल्या आहेत, असे कराचीच्या आयुक्तानी
सांगितले.