आम्ही एफ-16 विमानं कुठूनही खरेदी करू, पाकिस्ताननं अमेरिकेला ठणकावलं

By admin | Published: May 3, 2016 05:44 PM2016-05-03T17:44:58+5:302016-05-03T18:48:14+5:30

पाकिस्ताननं एफ 16 विमानं आम्ही कुठूनही खरेदी करू, अशा इशाराच अमेरिकेला दिला आहे.

We will buy F-16 aircraft from anywhere, Pakistan has banned the United States | आम्ही एफ-16 विमानं कुठूनही खरेदी करू, पाकिस्ताननं अमेरिकेला ठणकावलं

आम्ही एफ-16 विमानं कुठूनही खरेदी करू, पाकिस्ताननं अमेरिकेला ठणकावलं

Next

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 3- पाकिस्ताननं एफ 16 विमानं आम्ही कुठूनही खरेदी करू, अशा इशाराच अमेरिकेला दिला आहे. जर अमेरिकेनं आम्हाला एफ 16 विमानं खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, तर आम्ही दुसरीकडून विमानं खरेदी करू, असा सल्लावजा इशाराच पाकिस्ताननं अमेरिकेला दिला आहे.
 आमच्यासाठी एफ 16 विमानं महत्त्वाची आहेत. मात्र दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही जेएफ-17 थंडर विमानंही वापरू, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजिज यांनी म्हटलं आहे. जेएफ-17 थंडर विमानं चीन आणि पाकिस्ताननं एकत्रितपणे विकसित केली आहेत. ही विमानं पाकिस्तान हवाई दलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असाही इशारा सरताज अजिज यांनी दिल आहे. 
पाकिस्ताननं अमेरिकेकडून खरेदी केलेल्या एफ-16 विमानांचं पूर्ण पैसे द्यावेत, असं ओबामा सरकारकडून आधीच सुनिश्चित करण्यात आलं होतं. या विमान खरेदीत पाकिस्तानला कोणतेही अनुदान मिळणार नसल्याचं अमेरिकेनं आधीच स्पष्ट केलं आहे.

Web Title: We will buy F-16 aircraft from anywhere, Pakistan has banned the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.