व्हिसा मुलाखतीच्या ठिकाणी वैयक्तिक दस्तावेज विसरल्यास परत मिळतील का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:28 AM2018-01-04T00:28:24+5:302018-01-04T00:32:01+5:30
अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करत असताना तुम्हाला प्रामुख्यानं मुलाखतीच्या आधारावर व्हिसा दिला जातो, हे कायम डोक्यात ठेवा. ब-याचदा अधिकारी मुलाखतीदरम्यान दस्तावेजाचीही मागणी करतात. त्यामुळे कायम स्वतःजवळ दस्तावेज बाळगा.
प्रश्न- व्हिसा मिळवण्यासाठी मुलाखत देण्यास गेला असताना मी माझे वैयक्तिक दस्तावेज यूएस काऊन्सिलमध्ये विसरलो. मला ते दस्तावेज परत मिळू शकतात का ?
उत्तर- हो, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता अथवा आमच्या व्हिसा सपोर्ट सेंटरशी पत्रव्यवहारही करू शकता. त्यानंतर आम्ही पडताळणी करून तुम्हाला तुमचे दस्तावेज परत देऊ.
अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करत असताना तुम्हाला प्रामुख्यानं मुलाखतीच्या आधारावर व्हिसा दिला जातो, हे कायम डोक्यात ठेवा. ब-याचदा अधिकारी मुलाखतीदरम्यान दस्तावेजाचीही मागणी करतात. त्यामुळे कायम स्वतःजवळ दस्तावेज बाळगा. काही जण व्हिसा मिळवण्याच्या मुलाखतीला जाताना दस्तावेज घेऊन जात नाहीत. परंतु असे करू नका. व्हिसासाठी अर्ज करताना अधिकारी कोणत्याही प्रकारच्या दस्तावेजांची मागणी करू शकतात. तसेच तुम्ही योग्य दस्तावेजांची पूर्तता न केल्यास अधिकारी त्या दस्तावेजाचं पुनरावलोकन करू शकत नाही, हेसुद्धा कायम लक्षात ठेवा. व्हिसामध्येसुद्धा अनेक प्रकार असतात. जसे की, स्टुडंट व्हिसा, कलाकार व्हिसा. त्यामुळे मुलाखतीला जाताना योग्य दस्तावेज जवळ बाळगा आणि अधिका-यांना त्याची पूर्तता करा. अर्जदाराला www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर व्हिसा मिळवण्यासाठी कोणते दस्तावेज आवश्यक आहेत, याची माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिसाच्या मुलाखतीला जाण्याआधी हे संकेतस्थळ एकदा आवर्जून पाहा. व्हिसाची मुलाखत झाल्यानंतर अर्जदार त्या ठिकाणीच स्वतःचे महत्त्वाचे दस्तावेज विसरल्यास त्याला यूएस काऊन्सिल जबाबदार राहणार नाही. त्यामुळे स्वतःचे महत्त्वपूर्ण दस्तावेज यूएस काऊन्सिलमध्ये राहिले तर नाहीत ना, याची खात्री करूनच बाहेर पडा.