जीवघेण्या 'ब्लू व्हेल चॅलेंज'मागे आहे रशियातील हा तरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 02:45 PM2017-08-02T14:45:26+5:302017-08-02T15:09:40+5:30

खतरनाक अशा ब्लू व्हेल हा गेम रशियातील एका 22 वर्षीय तरुणानं बनवला आहे. तरुणांना आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहन केल्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून तो जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

The young man in Russia is behind the 'Blue-Valed Challenge' | जीवघेण्या 'ब्लू व्हेल चॅलेंज'मागे आहे रशियातील हा तरुण

जीवघेण्या 'ब्लू व्हेल चॅलेंज'मागे आहे रशियातील हा तरुण

googlenewsNext

नवी दिल्ली, दि. 2 - मुंबईतील अंधेरी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्यानंतर 'ब्ल्यू व्हेल' गेमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या मुलाने शनिवारी (29 जुलै) इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पण 'ब्ल्यू व्हेल' हा भयानक गेम नेमका कुणी बनवला? जाणून घेऊया जीवघेण्या गेमबाबतची माहिती.  

कुणी बनवला हा भयानक गेम?
'ब्ल्यू व्हेल' या खतरनाक गेमचा रशियातील सायबेरिया प्रांतातील एका तरुणानं शोध लावला. फिलिप ब्युडेकिन नावाच्या 22 वर्षीय तरुणानं 'ब्ल्यू व्हेल' चॅलेंजची सुरुवात केली.  तरुणांना आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहन केल्यामुळे फिलिप गेल्या 3 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मे महिन्यात फिलिपनं सेंट पीटर्सबर्ग न्यूजला मुलाखत दिली होती. यावेळी जाणूनबुजून तरुणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले का?, असा प्रश्न मुलाखतीदरम्यान फिलिपला विचारण्यात आला. यावेळी त्यानं ''हो. मी खरंच असेच केले. गोंधळून जाऊ नका तुम्हाला सर्व समजेल. प्रत्येकाला समजले'', अशी धक्कादायक कबुली त्यानं दिली.  

फिलिपला नेमके काय हवे होते?
लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यामागे फिलिपनं निरर्थक व हादरवणारे असे कारण दिले. त्याचे असे म्हणणे होते की, ''काही मनुष्य आहेत आणि काही केवळ जैविक कचरा. जी लोकं समाजासाठी कोणत्याही प्रकारे कामी येत नाहीत. जे केवळ समाजाला नुकसान पोहोचवत आहेत किंवा पोहोचवतील.  अशा लोकांना आपल्या समाजातून मी मुक्त करत होतो.''

ब्लू व्हेल या भयानक गेममुळे आतापर्यंत जगभरात 130 जणांचे बळी गेल्याचंही त्यानं नाकारले. केवळ 70 जणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची त्यानं कबुली दिली. उर्वरित लोकांनी त्याला संपर्क केला आणि त्यानंतर आत्महत्या केली. आपण आत्महत्या करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले नाही, असे स्पष्टीकरण फिलिपनं दिले. 
 

काय आहे ब्लू व्हेल चॅलेंज गेम?
ब्लू व्हेल हा एक व्हिडीओ गेम असून 2013मध्ये रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. हा गेम खेळणा-याला 50 चॅलेंजेस मिळतात. फिलिपनं लोकांसोबत विशेष करुन 20 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना टार्गेट करुन त्यांच्यासोबत ऑनलाइन संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. याद्वारे तो लोकांना स्वतःबाबत माहिती देण्यास सांगायचा, स्काइपवर त्यांच्यासोबत बोलायचा.  यावेळी तो कमकुवत लोकांची निवड करायचा. लोकांची निवड झाल्यानंतर अॅडमिन खेळाडूंना रोज एक टास्क देतात, हा टास्क 50 दिवसांमध्ये पूर्ण करायचा असतो. गेमची सुरुवात सोप्या टास्कने होते. मात्र यानंतर कठीण-कठीण टास्क दिले जातात. टास्कमध्ये हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगितली जाते.  प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या रुपात स्टोर करायचा असतो.

यामध्ये कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे, स्वत:ला इजा करून घेणे यांचा समावेश आहे. याचे चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवावे लागते, जेणेकरून दिलेले आव्हान पूर्ण होण्याची खात्री होते. अखेर पर्यवेक्षक सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान देतो. गेम डाउनलोड केला की, तो डिलिट होत नाही. वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीदेखील हॅक होण्याची शक्यता असते. एक-एक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या स्वरुपात पुरावा द्यावा लागतो त्यानंतरच खेळाडू पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो. 

गेमवरच बंदी घाला
ब्ल्यू व्हेल असो वा असे इतर गेम्स, यावर त्वरित प्रतिबंध आणणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी आणि पालकांनीही याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. मात्र, मुला-मुलींना वा तरुणपिढीला या गेमिंगपासून दूर ठेवताना हे लक्षात घेतले पाहिजे की, गेमिंग थांबविले की, त्यांना अस्वस्थ वाटू लागणार. त्यामुळे त्यांची अस्वस्थता ओळखून त्यांना समूजन घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. या कालावधीत १०० टक्के मुला-मुलींकडे, तरुणपिढीकडे लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियावर सर्फिंग करताना मुले नेमकी काय करतात, याची माहिती पालकांना असलीच पाहिजे. त्याचप्रमाणे, आपल्या पाल्याच्या मित्र-मैत्रिणींकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय
 

Web Title: The young man in Russia is behind the 'Blue-Valed Challenge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.