अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 01:04 PM2017-11-17T13:04:24+5:302017-11-17T13:07:27+5:30

अभ्यासाचा कंटळा आल्याने घरातून दहा महिन्यापूर्वी निघून गेलेला आकाश तांगडे यास शोधून पोलिसांनी शुक्रवाी आई-वडीलांच्या स्वाधीन केले.

10 months ago, the police left the house and did not want to study | अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून 

अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून 

googlenewsNext
ठळक मुद्दे शिक्षणाचा कंटाळा आल्याने आपण घरातून निघून गेलो  होतो, असे आकाशने सांगितले. नगरमध्ये करत होता शेतात काम 

परतूर (जि.जालना): अभ्यासाचा कंटळा आल्याने घरातून दहा महिन्यापूर्वी निघून गेलेला आकाश तांगडे यास शोधून पोलिसांनी शुक्रवाी आई-वडीलांच्या स्वाधीन केले. तो अहमदनगर येथे एका शेतक-याच्या शेतात काम करत होता. 

परतूर तालूक्यातील रोहीणा खू. येथील आकाश शिवाजी तांगडे हा शहरातील एका शाळेत दहावीत शिकत होता. शिक्षणाचा कंटाळा आल्याने तो अचानक रेल्वेने औरंगाबाद व तेथून पुढे अहमदनगर येथे गेला. येथे उत्तम मुरलीधर हराळ या शेतक-याची व आकाश याची ओळख झाली. यावेळी हराळ यांनी त्यास केवळ जेवणावर कामाला ठेवले. 

या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात वडिल शिवाजी तांगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याने पोलिस आकाशचा शोध घेत होते. गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव व पोलीस काँस्टेबल शाम गायके  यांनी नगर येथे  गेले. स्थानिक पोलिसांची मदत घेत पोलीस थेट हराळ यांच्या शेतात पोहचले. तेथून आकाशला ताब्यात घेवून गुरुवारी रात्री परतूर येथे आणले. 

शुक्रवारी सकाळी त्यास पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी शिक्षणाचा कंटाळा आल्याने आपण घरातून निघून गेलो  होतो, असे आकाशने सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पोलिस निरीक्षक आर. टी. रेंगे उपनिरीक्षक विजय जाधव, शाम गायके यांनी आकाशच्या शोध मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: 10 months ago, the police left the house and did not want to study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.