जगदंबा यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:31 AM2018-03-11T00:31:20+5:302018-03-11T00:32:02+5:30
भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील जगदंबा देवी यात्रा महोत्सवाची शनिवारी मुखवटा मिरवणुकीने उत्साहात सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील जगदंबा देवी यात्रा महोत्सवाची शनिवारी मुखवटा मिरवणुकीने उत्साहात सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
उत्सवातील मुखवटा मिरवणूक आणि बारागाड्या, दर्शनासाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश इ. भागांतून भाविकांनी हजेरी लावली. महिषासुराचे रुप आणि हळू हळू पेटणा-या मशाली, बोल भवानी माता की जय या जयघोषात परिसर दणाणून गेला. यानंतर पोत खेळण्याचा कार्यक्रम पार पडला. डोक्यावर एक भंदे, हातावर दोन भंदे, गळ्यात चाफ्याचा हार, मागे आबदागिरी असे देवीचे विलोभनीय रुपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली.