हत्याराचा धाक दाखवून मुंबईच्या व्यापाऱ्याची २७ लाख रूपयांची बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:15 AM2018-10-27T00:15:01+5:302018-10-27T00:15:31+5:30
मुंबई येथील व्यापारी विनोदकुमार श्रीकमल महंतो या तरूण व्यापा-याच्या मानेला सुरा लावून २७ लाख रूपये असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जालना : मुंबई येथील व्यापारी विनोदकुमार श्रीकमल महंतो या तरूण व्यापा-याच्या मानेला सुरा लावून २७ लाख रूपये असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जालना रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर घडली.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, विनोदकुमार महंतो, जोशी यांनी लातूर, नांदेड, परभणी आणि जालना येथील व्यापाºयांकडे जावून त्यांच्या वही विक्रीच्या व्यवसायातील वसूलीची रक्कम जमा केली होती. जवळपास २७ लाख रूपये घेवून मुंबईला जाण्यासाठी ते जालना रेल्वे स्थानकावर आले होते. फलाट क्रमांक दोनवर हे दोघेही उभे असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग हूसकावून नेली.
त्याप्रकरणी विनोदकुमार महंतो यांच्या तक्रारीवरून जालना येथील रेल्वे पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल सुरू करण्याची प्रक्रीया सुरू होती. घटनेची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार जालन्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, आणि एडीएस यशवंत जाधव यांनी भेट दिली. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसाचे पथक रवाना करण्यात आले आहे.