नाट्यांकुरचा बालनाट्य महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:19 AM2018-01-03T00:19:58+5:302018-01-03T00:20:02+5:30
नाट्यांकुर संस्थेचा चाळिसावा बालनाट्य महोत्सव ५ ते ८ जानेवारीदरम्यान मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव सुंदर कुँवरपुरिया यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांना हक्काचा रंगमंच उपलब्ध करून देणा-या येथील नाट्यांकुर संस्थेचा चाळिसावा बालनाट्य महोत्सव ५ ते ८ जानेवारीदरम्यान मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव सुंदर कुँवरपुरिया यांनी दिली. यानिमित्त सध्या जोरदार तयारी सुरु असून बालकलावंतांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
बालनाट्य महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात संघप्रमुखांची एक बैठक मंगळवारी नाट्यांकुरचे अध्यक्ष ध.स. जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सचिव सुंदर कुँवरपुरिया, प्रकल्प प्रमुख आशिष रसाळ, जयेश पहाडे, नरेंद्र जोशी, शाम जवादे, अल्ताफ बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी चार वाजता फुलंब्रीकर नाट्यगृहात नगरसेवक रमेश गौरक्षक यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी संत रोहिदास व्याख्यानमालेचे अध्यक्ष विजयकुमार पंडित हे राहतील. अध्यक्षस्थानी उद्योजक मुकेश गुप्ता हे राहतील. यावेळी संगीता गुप्ता, पत्रकार बद्रीनाथ टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.