वाकुळणीत सतार व पखवाजाची जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:37 AM2018-03-13T00:37:23+5:302018-03-13T00:37:36+5:30

युरोपमधील बेल्जीयम येथून आलेले जगविख्यात सतारवादक बर्ट कार्नेलिस आणि महाराष्ट्रातील नामांकित पखवाज् ावादक पं़ उध्दवबापू आपेगावकर यांच्यात जुगलबंदी रंगली. निमित्त होते वाकुळणी येथील संगीत महोत्सवाचे.

Sattar and Pakhwaza Combination | वाकुळणीत सतार व पखवाजाची जुगलबंदी

वाकुळणीत सतार व पखवाजाची जुगलबंदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : युरोपमधील बेल्जीयम येथून आलेले जगविख्यात सतारवादक बर्ट कार्नेलिस आणि महाराष्ट्रातील नामांकित पखवाज् ावादक पं़ उध्दवबापू आपेगावकर यांच्यात जुगलबंदी रंगली. निमित्त होते वाकुळणी येथील संगीत महोत्सवाचे.
तालुक्यातील वाकुळणी येथे संत वाङमय सेवा संघाच्या वतीने सोमवारी या दोन्ही जखविख्यात कलाकारांच्या उपस्थितीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़ या महोत्सवाचे उद्घाटक मानव विकासचे आयुक्त भास्कर मुंडे हे होते. अध्यक्षस्थान हभप पंढरीनाथ महाराज तावरे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. कल्याण काळे, पखवाज वादक हभप दादा महाराज पाटील, हभप शिवाजी महाराज शिंदे, हभप कृष्णा महाराज काकडे, हभप राम शेळके आदी उपस्थित होते़ यावेळी बर्ट कार्नेलिस व पं़उध्दवबापू आपेगावकर यांची जुगलबंदी सुमारे अडीच तास रंगली़ या जुगलबंदीची सुरुवात पुरीया धनाश्री या रागाने करण्यात आली. नंतर यमन, मुल्तानी व शेवटी भैरवी असे विविध राग बर्ट कार्नेलिस यांनी सतारीवर वाजविले. शेवटी रघुपती राघव राजाराम ही धून वाजवून श्रोत्यांची मने जिंकली.
यावेळी त्यांना पं उध्दवबापू आपेगावकर यांनी पखवाजाची उत्तम साथ मिळाली़ या दोन्ही कलाकारांचे एकसोबत असे कार्यक्रम अनेक देशविदेशात होतात. आज मात्र वाकुळणीत ही जुगलबंदी झाली. यावेळी सतारवादक बर्ट कार्नेलिस म्हणाले की, मला या संगीत श्रोत्यांमध्येच देव दिसतो. संगीतातून त्यांना सतत भेटत असतो़ हभप पंढरीनाथ तावरे महाराज म्हणाले की, या कार्यक्रमामुळे येथील पखवाज वादक विद्यार्थ्यांना व वारकरी सांप्रदायाला सतार व पखवाजाची साथ अनुभवता आली. विद्यार्थ्यांना पखवाजाचे बोल,बारकावे शिकायला मिळाले. या दोन्ही कलाकारांनी हा कार्यक्रम कै. शंकरबापू आपेगावकर व गुरूवर्य कै. भानुदास अटाळकर यांना गुरूदक्षिणा म्हणून समर्पित केला.

Web Title: Sattar and Pakhwaza Combination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.