दानपेटी फोडणाऱ्यास पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:57 AM2018-05-23T00:57:06+5:302018-05-23T00:57:06+5:30

नूतनवसाहत भागातील तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी फोडणा-या एकास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नूतनवसाहत भागातील शासकीय गोदाम परिसरात मंगळवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली.

Thief chased and caught | दानपेटी फोडणाऱ्यास पाठलाग करून पकडले

दानपेटी फोडणाऱ्यास पाठलाग करून पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील नूतनवसाहत भागातील तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी फोडणा-या एकास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नूतनवसाहत भागातील शासकीय गोदाम परिसरात मंगळवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली.
किशोर बाळू खंदारे (रा. २४ लक्कडकोट) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, त्याचा साथीदार पवन चौधरी (रा. बरवारगल्ली, पाणीवेस ) हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला. संशयित दोघांनी नूतनवसाहत भागातील तुळजाभवानी मंदिराचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. मंदिराच्या गाभाºयाचे प्रवेशद्वार तोडून दानपेटी फोडली. दानपेटीतील रोख १८ हजार १२३ रुपये व सोन्याचे डोरले, मीन, नथ असा एकूण वीस हजार १२३ रुपयांचा मुद्देमाल चोरला. चोरलेले साहित्य घेवून जात असताना एका व्यक्तीने पाहिले. त्याने कदीम जालना पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कॉन्स्टेबल बी. एस. जाधव, राजू वाघमारे, बापूसाहेब भारकड, बोटवे, जोनवल, व्ही.पी. खार्डे यांनी गस्तीवरील वाहनांमधून दोघांचा पाठलाग केला. शासकीय गोदामाच्या परिसरातूनपळणा-या किशोर खंदारे यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. तर अन्य दुस-या फरार झाला. या प्रकरणी पुजारी एकनाथ दशरथ बागल यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार शेजूळ तपास करत आहेत.

Web Title: Thief chased and caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.