घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:48 AM2018-11-14T00:48:08+5:302018-11-14T00:48:50+5:30
जाफराबाद येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जाफराबाद येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संजयसिंग कृष्णासिंग कबुली, अर्जुनसिंग छगनसिंग भोंड असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, १० नोव्हेंबर रोजी जाफराबाद येथे चार दुकानांचे शटर तोडून संजयसिंग भादा याने त्याच्या साथीदारसह घरफोडी केली. या माहितीवरून त्यांनी संजयसिंग भादा याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सदरील गुन्हा साथीदार अर्जुनसिंग छगनसिंग भोंड व करणसिंग छगनसिंग भोंड याच्यासह केल्याची कबूली दिली. त्यानंतर गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार (क्रं.एम. एच. २० वाय. ८५५९) ताब्यात घेवून कारची पाहणी केली असता, कारमध्ये ६५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने मिळून आले. त्याच्याकडून चांदीचे दागीने व कार असा एकूण २ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याचा साथीदार अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७ हजार ५०० रुपये मिळून आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, कांबळे, तेलंग्रे, तंगे, साबळे, गडदे, बाविस्कर, वैराळ, चौधरी, चेके, धुमाळ, संदिप मांन्टे, लखनसिंग पचलोरे, महिला कर्मचारी मंदा बनसोडे यांनी केली.
जालना : सोनलनगर येथील चोरी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींनी आणखी तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. दोन महिन्यापूर्वी सोनलनगर येथील गणेश भवर यांच्या घरी भरदिवसा घरफोडी केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी स्वप्नील रमेश कुलकर्णी (रा. करमाड ता. जि. औरंगाबाद), सूर्यकांत गोपीनाथ जाधव यांना अटक केली होती.
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता आणखी घरफोड्यांची कबुली त्यांनी जालना शहरातील सोनलनगर भागात दोन व सुखशांतीनगर भागात एक अशा तीन ठिकाणी चोरी करुन ऐवज चोरी केल्याची दिली.