जळगावात रायसोनीनगरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने डंपरच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:54 PM2017-11-03T12:54:22+5:302017-11-03T12:54:55+5:30
प्रतिकार करण्यासाठी आलेल्यास मारहाण
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - वाळूच्या व्यवसायातून नेरी, ता. जामनेर येथील 10 ते 15 जणांच्या टोळक्याने रायसोनी नगरात मध्यरात्री एक वाजता धुडगुस घालून दोन डंपरच्या काचा फोडल्या. प्रतिकार करण्यासाठी आलेल्या विकास कौतिक पाटील यांना मारहाण करीत त्यांच्या प}ी प्रतिभा यांनाही धक्काबुक्की केली. पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत विकास पाटील यांचा मुलगा हरीश याने दिलेल्या माहितीनुसार भाऊ दीपक व नेरी येथील काही वाळू व्यावसायिक यांच्यात वाळू व्यवसायावरुनच काही महिन्यापासून वाद झाला होता. निमखेडी शिवारात डंपरखाली मुलगा चिरडला गेला होता तेव्हा या वादाची ठिणगी पडली होती. जुना वाद असल्याने नेरी येथील 10 ते 12 जण हरीश व दीपक या दोघ भावंडाना मारहाण करण्यासाठी बुधवारी रात्री रायसोनी नगरातील घरी आले. मात्र हे दोन्ही भाऊ पाचोरा येथे गेल्याने त्याचा संताप डंपरवर काढला. दोन्ही डंपरच्या (क्र.एम.एच.19 सी.वाय.9171 व एम.एच.19 ङोड 1971) काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसात नोंद झालेली नाही.
मध्यरात्री टोळके संतापात आले होते, सुदैवाने हरीश व दीपक हे दोन्ही घरी नव्हते. त्यामुळे त्यांचा बचाव झाला. दरम्यान, पाटील यांचे डंपर वाळू घेऊन जामनेर येथे जातात. या भागात डंपर घेऊन येवू नका म्हणून मारहाण करणा:यांनी त्यांना धमकावले होते. भविष्यात डंपर दिसले तर ते पेटवून टाकू अशी धमकीही देण्यात आली होती. त्याचे रेकॉर्डीग आपल्याकडे असल्याचे हरीश याने सांगितले.