अंजनी धरणात पाण्याची आवक कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:47 PM2018-08-18T15:47:57+5:302018-08-18T15:48:22+5:30
जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
Next
एरंडोल, जि.जळगाव : जवळपास पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर तालुक्यात गुरुवारी श्रावणी सरींनी हजेरी लावली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले, पण अजूनही अंजनी धरणाच्या साठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. गुरुवारच्या पावसामुळे जेमतेम १० सेंटीमीटरने पाणी पातळीत वाढ झाली. पाण्याची आवक कमी असल्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे सावट कायम आहे.
अंजनी धरणात अद्याप मृत साठा आहे. जवळपास निम्मे पावसाळा संपला तरी जलसाठ्यात फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे पाऊस पडूनही ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी स्थिती आहे. परिणामी चांगला पाऊस पडावा, अशीच सर्व जण वरुणराजाकडे प्रार्थना करीत आहेत.