कीटकनाशकांचा वापर करावा जपून

By Ram.jadhav | Published: October 23, 2017 11:47 PM2017-10-23T23:47:37+5:302017-10-23T23:53:38+5:30

शेतकºयांनी इतर एकात्मिक किड नियंत्रण पद्धतींचा वापर करून महागड्या औषधींचा खर्च कमी करायला हवा़ तसेच मानवी आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे़

Beware of using insecticides | कीटकनाशकांचा वापर करावा जपून

कीटकनाशकांचा वापर करावा जपून

googlenewsNext
ठळक मुद्देयोग्य प्रमाण गरजेचेएकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर वाढावाशासकीय यंत्रणेची भूमिका महत्त्वाची

आॅनलाईन लोकमत, दि़ २४ - बी.डी.जडे
जळगाव : भारतात सर्वाधिक रासायनिक कीड व कीटकनाशके वापरण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र अव्वल राज्य ठरले आहे़ दिवसेंदिवस महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या रासायनिक औषधांचा कीड नियंत्रणासाठी वापर करीत आहेत़ औषधांचा हा वाढता वापर शेतकºयांसाठी तत्काळ घातक तर ठरतच आहे़, शिवाय नैसर्गिक चक्रालाही यामुळे बाधा निर्माण होत आहे़ तसेच रसायनांच्या अतिवापरामुळे भाजीपाला व इतरही सर्व पिकांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन बहुतेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे़ आजच्या घडीला शेतकºयांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची गरज आहे़ विशेष करून द्राक्ष, डाळिंब, कपाशी व भाजीपाल्याची सर्व पिके यांच्यासंबंधी शेतकºयांनी खास काळजी घेण्याची गरज आहे़ शेतकºयांनी इतर एकात्मिक किड नियंत्रण पद्धतींचा वापर करून महागड्या औषधींचा खर्च कमी करायला हवा़ तसेच मानवी आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे़
औषधांचा प्रकाऱ़़
आॅर्गनो क्लोराईड, आॅर्गनो फॉस्फरस, पायरेथ्रॉईड, नेकेटोनॉईड, कारबॅमाईट्स तसेच स्पर्शजन्य व आंतरप्रवाही या प्रकारातील औषधांची निवड कीटकांच्या प्रकारानुसार करावी़ कोणतेही औषध वापरताना ते प्रमाणापेक्षा वापरू नये, आवश्यक असल्यास त्यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच औषधांचा योग्य वापर केला जावा़ शासनाकडून औषध विक्रेत्यांना व शेतकºयांनाही वेळोवेळी नियमितपणे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे़
जैविक पद्धतींचा वापर जास्त करावा़़़
एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा शेतकºयांनी वापर करावा़ तसेच जैविक पद्धतीने कीटक नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काचा वापर करावा, निंबांळी अर्क, तंबाकू अर्क, गोमूत्र, कामगंध सापळे, पिवळे चिकट पुठ्ठे, सापळा पिके, प्रकाश सापळा इत्यादी पद्धतींचा वापर करावा़ तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसताच शेतकºयांना याबाबत जागृत करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे़ तसेच फवारणी करताना शेतकºयांनी भरउन्हात फवारणी करणे टाळावे, हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराला पूर्णपणे झाकून, हातमोजे, चष्मा किंवा हेल्मेट (सेफ्टी किट) इत्यादी साहित्याचा वापर अवश्य करावा़ शक्यतो संपूर्ण अंग झाकूनच कोणत्याही औषधांची फवारणी करावी़ फवारणीनंतर साबणाने स्वच्छ अंघोळ करणे गरजेचे आहे़
घ्यावयाची काळजी़़
एकच पीक पद्धती टाळावी, म्हणजेच पिकांची फेरपालट करणे, कीटकांचे जीवन चक्र तोडावे, लागवडीच्या वेळेत बदल करणे, खूप उशिरा लागवड करणे टाळावे, भौतिक, जैविक, यांत्रिक आणि रासायनिक अशा सर्व प्रकारच्या पद्धतींचा आलटून-पालटून वापर करावा़ तसेच स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाय अवलंबून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो़ किडींच्या व कीटकांच्या प्रकारानुसार, योग्य त्या कीटकनाशकांचा वापर करावा़ जसे, कीटकांच्या तोडांचा आकार, त्यांचा चावण्याचा प्रकार, रसशोषण करण्याची पद्धत, टोचण्याची पद्धत आदींचे बारकाईने निरीक्षण करून व किडींचा प्रकार ओळखूनच औषधांची निवड करावी़ जास्त औषधे एकत्र करू नयेत़़
शेतकºयांनी किडींची ओळख पटल्यावर योग्य ते एकच औषधे वापरावे़ दोनपेक्षा जास्त कीटकनाशके एकत्र करून वापरू नयेत़ तसेच वेगवेगळ्या प्रकारातीलही अनेक औषधे एकाच वेळी एकत्र करून फवारणी करू नये़ एका वेळी एकच कीडनाशक व बुरशीनाशक वापरावे़
औषधांवरील या चिन्हांचे निरीक्षण करून विषारी औषधांची तीव्रता तपासता येते़ गरजेनुसार यातील औषधांचा वापर करावा़

Web Title: Beware of using insecticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.