दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे खान्देशातून जाणा:या रेल्वे गाडय़ांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:50 PM2017-08-29T12:50:39+5:302017-08-29T12:51:08+5:30
अनेक गाडय़ांच्या मार्गात बदल, काही गाडय़ा रद्द, पंजाबमेल इगतपुरीर्पयतच धावणार
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 29 - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आसनगाव-वाशिंद दरम्यान, 12290 अप नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला आज सकाळी 6.33 वाजता झालेल्या अपघातामुळे दिल्ली-मुंबई आणि नागपूर-मुंबई मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, मुंबईहून निघणा:या अनेक लांबपल्याच्या प्रवासी गाडय़ा पुणे, दौंड, मनमाडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक व पंजाब मेल इगतपुरीर्पयतच धावणार असल्याची माहिती येथील रेल्वेच्या नियंत्रण कक्षाकडून ‘लोकमत’ला देण्यात आली.
मार्ग बदलेल्या आणि रद्द झालेल्या प्रवासी गाडय़ांचा तपशील या प्रमाणे. अप ट्रेन- 12140 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी नाशिक र्पयत धावेल. तेथून 12139 डाऊन नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस म्हणून परतीच्या दिशेने धावेल. 12138 मुंबई-फिरोजपूर पंजाबमेल इगतपूरी र्पयत धावणार आहे. 11025 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस मनमाड,दौंड मार्गे वळविण्यात आली आहे.
रद्द गाडय़ा
12110 मनमाड-मुंबई पंचवटी, 22102 मनमाड-मुंबई राज्यरानी, 12111 गोदावरी या तीनही गाडय़ा इगतपूरी र्पयत व तेथे रद्द करण्यात आल्या आहेत.
डाऊन गाडय़ा- 12159 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, 17617 तपोवन एक्स्प्रेस,12336 भागलपूर एक्स्प्रेस, 12534 पुष्पक एक्स्प्रेस, 15017 काशि एक्स्प्रेस या गाडय़ा मनमाड, दौंड, पुणे मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या आहेत. 511533 मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.
यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहे.