जामनेर नगरपालिकेसाठी प्रभाग रचना जाहीर होताच सुरु झाल्या हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:35 PM2017-12-11T17:35:24+5:302017-12-11T17:38:17+5:30

प्रभाग तीनचा भाग मुस्लीमवस्तीला जोडल्याने भरत रेशवाल यांनी घेतली पहिली हरकत

Due to the Jamnar Municipality, the ward structure was declared as soon as the ward structure was declared | जामनेर नगरपालिकेसाठी प्रभाग रचना जाहीर होताच सुरु झाल्या हरकती

जामनेर नगरपालिकेसाठी प्रभाग रचना जाहीर होताच सुरु झाल्या हरकती

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन प्रभाग रचनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमावस्थाराष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रभाग रचनेवरून संतापराजकीय दबावाखाली प्रभाग रचना जाहीर केल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमत
जामनेर,दि.११ : आगामी काळात होणाºया जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे सोमवारी जाहीर करण्यात आले. ते पाहण्यासाठी पालिका कार्यालय व तलाठी कार्यालयात कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केली. या प्रभाग रचनेवर हरकती १८ डिसेंबर पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. सोमवारी पहिली हरकत भरत रेशवाल यांनी दाखल केली.
प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत त्या प्रभागात फक्त गट क्रमांकाचाच उल्लेख असल्याने त्यात नेमका कोणता भाग किंवा वस्ती समाविष्ट आहे याची माहिती सर्वसामान्य नागरीकांना समजत नसल्याने संभ्रमावस्था कायम आहे. उपलब्ध माहितीनुसार जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे बोलले जात आहे. विरोधकांना सुरक्षित प्रभाग राहु नये यासाठी मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे अन्य प्रभागात जोडण्यात आले आहेत.
प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तर काही प्रभागात सत्ताधारी भाजपमध्येच उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ होइल असे बोलले जात आहे. राजकीय दबावाखाली प्रभाग रचना केल्याचा आरोप सोमवारी हरकत घेतलेल्या भरत रेशवाल यांनी केला आहे. प्रभाग तीन चा काही भाग कांग नदीपलीकडील मुस्लीम वस्तीला जोडण्यात आल्याने त्यांनी यावर हरकत घेतली आहे.





 

Web Title: Due to the Jamnar Municipality, the ward structure was declared as soon as the ward structure was declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.