उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 09:47 PM2017-10-27T21:47:14+5:302017-10-27T21:47:40+5:30
तलाठीबांधवांच्याआंदोलनामुळेविद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी उत्पन्नांचे दाखले आवश्यक आहे.मात्र तो ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाआहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२७ - तलाठीबांधवांच्याआंदोलनामुळेविद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी उत्पन्नांचे दाखले आवश्यक आहे.मात्र तो ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाआहे.
२ आॅक्टोबरपासून तलाठी संघटनांनी विविध २५ मागण्यांसाठी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे ग्रामीण भागात रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला नागरिकांना दिला जात नाही. शासनाकडून याबाबत कोणतीही सकारात्मक चर्चा होत नसल्याने तलाठी संघटनांनी आपले बहिष्कार आंदोलन सुरुच ठेवले आहे. मात्र या आंदोलनाचा फटका महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी ३१ आॅक्टोबर शेवटची मुदत आहे. मात्र उत्पन्नाचे दाखल मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता येत नसल्याचे चित्र आहे.
महाविद्यालयांकडून तहसीलदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
उत्पन्नांचे दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अडचणी येवू नये म्हणून तहसील कार्यालयांकडून महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेताना उत्पन्नांचा दाखल्याऐवजी विद्यार्थ्यांकडून ‘स्वयंघोषणा’ पत्र घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत. तलाठ्यांचे आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यार्थी आपला उत्पन्नांचा दाखला जमा करतील असे या पत्रकात म्हटले आहे. मात्र महाविद्यालयांकडून तहसीलदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले असून, विद्यार्थ्यांकडून उत्पन्नांचा दाखला मागितला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अडचणी वाढल्या आहेत.
उत्पन्न दाखल्यांसाठी ४०० ते १५०० रुपये
१.शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्याने तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र तलाठी संघटनांकडून सुरु असलेल्या आंदोलनाचा फायदा वेंडर कडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जात असल्याचीतक्रारविद्यार्थ्यांनी‘लोकमत’कडेकेली.
२. एका दिवसात उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये घेतले जात आहेत. तर तीन ते चार दिवसात दाखला हवाअसल्यास ४०० ते ६०० रुपये वेंडर्सकडून घेतले जात आहेत.
मुदत वाढविण्याची मागणी
५ आॅगस्टपासून शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्याने महिनाभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करता आले नाही. सर्व्हरची समस्या मार्गी लागल्यानंतर आता तलाठ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.