तांत्रिक अडचणींमुळे जळगाव जिल्ह्यात ५८ ग्रा.पं. साठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:01 PM2018-02-05T22:01:47+5:302018-02-05T22:05:41+5:30

जळगाव जिल्ह्यातील चौथ्या टप्प्यात ५८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर १३२ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. ५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी आॅनलाईन अर्ज भरतांंना तांत्रिक अडचणी आल्याने एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही.

 Due to technical difficulties, 58 grams in Jalgaon district There is no application on the first day for | तांत्रिक अडचणींमुळे जळगाव जिल्ह्यात ५८ ग्रा.पं. साठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

तांत्रिक अडचणींमुळे जळगाव जिल्ह्यात ५८ ग्रा.पं. साठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

Next
ठळक मुद्दे१३२ ग्रामपंचायतींमध्ये होत आहेत पोटनिवडणुकाशेंदुर्णीत नगरपंचायत स्थापन्याचे आदेश निघाल्याने निवडणूक प्रक्रीया थांबविली जात वैधता प्रमाणपत्राच्या अटींमुळे एरंडोल उमेदवार मेटाकुटीस


लोकमत आॅनलाईन
जळगाव, दि.५ : जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात ५८ ग्रामपंचायतींसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. तर १३२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत असून सोमवारी आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्यामुळे एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान, संपूर्ण महाराष्टÑात आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया एकाच वेळी सुरू झाल्यामुळे गर्दी होऊन निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लोड पडला. त्यामुळे ही वेबसाईट ठप्प पडल्याची माहिती निवडणूक सूत्रांकडून देण्यात आली.

अमळनेरला अर्धा अर्ज भरला अन..
अमळनेर येथे तांत्रिक अडचणीमुळे सायंकाळपर्यंत वेबसाईट बंद असल्याने पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे हाल झाले.
तालुक्यात मंगरूळ, अमळगाव , ढेकूसीम, गोवर्धन, दोधवद, लोंढवे , भरवस या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर खेडी खुर्द प्र.ज, खेडी खुर्द प्र. अ, लोण बुद्रूक , बोदर्डे, आर्डी, आनोरे , लोणचारम, कुºहे खुर्द, खवशी बुद्रूक , एकतास या गावांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. सोमवारपासून अर्ज भरणे सुरू झाले. मात्र वेबसाईट सुरू झाल्यानंतर अर्धा अर्ज भरला गेल्यानंतर आॅनलाईन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी त्रुटी दाखवण्यात येत होती. फक्त मोजून ४ मिनिटांसाठी वेबसाईट सुरू झाली परंतु एकही अर्ज दाखल न झाल्याने उमेदवारांचे हाल झाले.
चोपड्यातही उमेदवारांची दमछाक
तांत्रिक अडचणींमुळे सायंकाळपर्यंत वेबसाईट बंद असल्याने पहिल्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. ग्रामीण भागातील उमेदवारांना आॅनलाईनसंदर्भात पूर्ण माहिती नसल्याने तसेच महाराष्ट्रात एकाच वेळी वेबसाईटवर लॉगिन झाल्याने सदर वेबसाईट चालत नव्हती, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे हाल झालेत.
चोपडा तालुक्यात तिसºया टप्प्यात आठ गावांमध्ये सार्वत्रिक निवडणूक तर सहा गावांमध्ये पोटनिवडणूक होत असून वाळकी, विचखेडा, अंबाडे, कठोरा, कोळंबा, नरवाडे, घुमावल बुद्रुक, तावसे खुर्द येथे पंचवार्षिक तर अजंतीसीम, घोडगाव, चौगाव, गलंगी, खाचणे, वटार येथे पोटनिवडणुका होत आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले. मात्र वेबसाईट सुरू झाल्यानंतर काही अंशी अर्ज भरला गेल्यानंतर आॅनलाईन प्रतिज्ञापत्र दाखल करतांना त्रुटी दाखवण्यात येत होती. फक्त ५ ते १० मिनिटांसाठी वेबसाईट सुरू झाली आणि बंद पडली त्यामुळे एकही अर्ज दाखल न झाल्याने उमेदवारांचे हाल झाले. मंगळवारपासून प्रक्रीया सुरळीत होईल व अर्ज दाखल होतील. अशी माहिती निवडणूक नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवण यांनी दिली.
दरम्यान, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव येथे सोमवारी कोणीही उमेदवार अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात न आल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे येथे तांत्रिक समस्या उद्भवल्याचे दिसून आले नाही.
जातवैधता प्रमाणपत्राच्या अटींमुळे उमेदवार मेटाकुटीला
एरंडोल तालुक्यात पहिल्या दिवशी जात वैधता प्रमाणपत्राच्या जाचक अटींमुळे उमेदवार अर्ज भरतांना मेटाकुटीस आले होते. भालगाव- नंदगाव ग्रुप, वनकोठे, बांभोरी ग्रुप, वरखेडी, खेडगाव, खडके बु।। या ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणुका तसेच धारागीर, जळू, उत्राण, आडगाव या ग्रा.पं. च्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
धरणगाव तालुक्यात चांदसर, पाळधी बुद्रुक आणि भोद खुर्द या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत़ तर तालुक्यातील ११ ठिकाणी पोटनिवडणूका होणार आहेत़ तथापि पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.
शेंदुर्णी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रीया थांबविली
जामनेर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, निवडणूक होणाºया १५ ग्रामपंचायतीत शेंदुर्णीचा देखील समावेश आहे. मात्र येथे नगरपंचायत स्थापनेची अधिसूचना नगरविकास विभागाने शनिवारीच काढल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीया थांबविल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली. खडकी, तोरनाळे, पहुरपेठ, नवी दाभाडी, पठाडतांडा, गारखेडे खुर्द, सामरोद, गोंडखेल, एकुलती बुद्रुक, कापूसवाडी, गोरनाळे, शहापूर, शिंगाईत व दोंदवाडे या ग्रा.पं.साठी निवडणूक होणार आहे.
२५ रोजी मतदान
जिल्ह्यात मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहे. १२ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत आहे. २५ रोजी मतदान होणार असून २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
पोटनिवडणूक होणाºया तालुकानिहाय ग्रामपंचायती
अमळनेर -१०, भडगाव -८, रावेर - २०, यावल - १८, पारोळा - १६, पाचोरा - ८, मुक्ताईनगर - १७, जामनेर - ४, जळगाव - ७, एरंडोल - ४, धरणगाव - ७, चोपडा - ६, चाळीसगाव - ४, बोदवड - २, भुसावळ - १.

Web Title:  Due to technical difficulties, 58 grams in Jalgaon district There is no application on the first day for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.