लोकसभेसाठी फेब्रुवारीत आचारसंहिता व एप्रिलमध्ये निवडणुका : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:46 PM2018-10-01T17:46:42+5:302018-10-01T17:48:15+5:30
आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल व एप्रिल महिन्यात निवडणुका होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिली.
जळगाव : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल व एप्रिल महिन्यात निवडणुका होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
९ महिन्यानंतर आज ही बैठक झाल्याने राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यावरुन दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यासाठी पुरेसा वेळ देत नाही, यावरुन डॉ.पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आदर्श शिक्षक निवडावे लागतात याची खंत : चंद्रकांत पाटील
दरम्यान, आदर्श शिक्षक निवडावे लागतात याची खंत असून संपूर्ण शिक्षकांनीच आदर्श व्हावे अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी
जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणसोहळ्याप्रसंगी व्यक्त केली. जिल्हा परिषद व मनपा शाळांच्या विकासासाठी शासनातर्फे विविध योजना राबवून निधी उपलब्ध करून दिला जात असतो, मात्र शासनाला मर्यादा आहेत. एकट्या शासनाच्या भरोशावर शाळा सक्षम करणे शक्य नाही़ त्यामुळे आता लोकसहभागातून शाळांचा विकास करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.