हद्दपार आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:47 PM2018-03-29T13:47:54+5:302018-03-29T13:47:54+5:30

२ हजार रुपये दंडाची शिक्षा

Exile: Six months imprisonment | हद्दपार आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा

हद्दपार आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा

Next

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतानाही कायद्याचे उल्लंघन करुन शहरात वावरणाऱ्या छोटू सुदाम पुजारी (वय ४२, रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव ) या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून बुधवारी सहा महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत वृत्त असे की, छोटू पुजारी याला २०११ मध्ये वर्षभरासाठी जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, धुळे या जिल्ह्यातून हद्दपार केले होते. तरीही तो विनापरवाना ७ मे २०११ रोजी शहरात फिरतांना आढळून आला होता. शहर पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर कॉन्स्टेबल प्रितम पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात कामकाज चालले. साक्षी पुराव्यावरून छोटू पुजारी याला न्यायालयाने दोषी ठरविले. सरकारतर्फे अ‍ॅड. किशोर तडवी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Exile: Six months imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.