जळगावात दुचाकीची अंत्ययात्रा काढत इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:01 PM2018-05-29T23:01:12+5:302018-05-29T23:01:12+5:30

पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ मनसेतर्फे २९ मे रोजी आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर दुुचाकीची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले.

Fuel price hike in Jalgaon for the lifting of two-wheelers | जळगावात दुचाकीची अंत्ययात्रा काढत इंधन दरवाढीचा निषेध

जळगावात दुचाकीची अंत्ययात्रा काढत इंधन दरवाढीचा निषेध

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगावात आंदोलनसरकारच्या निषेधाच्या दिल्या घोषणाकाही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल दरात सातत्याने वाढ

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२९ : पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ मनसेतर्फे २९ मे रोजी आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर दुुचाकीची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा देत दुचाकीची अंत्ययात्रा काढली.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासुन पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनसेतर्फे दरवाढीचा निषेध करण्यासाठी थेट दुचाकीची अंत्ययात्रा काढत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
आकाशवाणी चौकातून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. दुचाकीला फुलांनी सजवुन, चार कार्यकर्त्यांनी खाद्यांवर धरुन अंत्ययात्रा काढली. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्ययात्रा आल्यानंतर याठिकाणी पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विरेश पाटील, संजय नन्नवरे, चेतन आढळकर, अविनाश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Fuel price hike in Jalgaon for the lifting of two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.