तापमान वाढीमुळे संकंट, केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:36 PM2018-04-20T13:36:28+5:302018-04-20T13:50:09+5:30

बिडगाव परिसरात केळी बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

fungal diseases on banana | तापमान वाढीमुळे संकंट, केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

तापमान वाढीमुळे संकंट, केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देशेतकरी संकटात घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

आॅनलाइन लोकमत
पारोळा, जि. जळगाव, दि. २० - निम्म्याहून अधिक एप्रिल महिना उलटून तापमानात प्रंचड वाढलेले आहे. यामुळे बिडगाव परीसरात केळी बागांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी केळीला रात्रीचा दिवस करीत पाणी देत असले तरी वाढत्या तापमानामुळे केळीची पाने करपू लागली आहेत. वाढत्या तापमानामुळे शेतकºयांपुढे नवीन अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.
चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये केळीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात विशेषत: सातपुडा पट्यातील भागात केळी ही चांगली पिकत असते. त्यानुसार भरघोस उत्पादनही घेतले जाते.चोपडा तालुक्यात सद्यस्थितित जुनारी पिलबाग व काढणीवर आलेली नवतीबाग यांचे क्षेत्र जवळजवळ ५ हजार हेक्टरवर आहे. सध्या वाढत चाललेले तापमानामुळे शेतक-यांच्या संकंटात वाढ झालेली आहे. यात पाने कोरडी पडणे, घड निसटून जाणे, पाने करपणे, घडांवर प्रखर सूर्यकिरण पडणे यामुळे घड खराब होऊन काळे पडत आहे. यामुळे ही घडं कवडीमोल भावातही व्यापारी घेत नाही. केळी बाबत नेहमीच शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. यामुळे बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव काही केळी बागांवर झालेला आढळतो. शेतकरी आधीच कमी भावात केळी खरेदी, तापमानात वाढ ही दोन प्रमुख कारणांमुळे संकटात आहे. आता तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. मे हिटचा तडाखा येणार असल्यामुळे केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतक-यांची धडपडही सुरु आहे. यात अजून खालवत चाललेली पाण्याची पातळी यामुळेही शेतकरी अधिकच चिंतेत सापडलेला आहे.
केळी वाचवण्यासाठी शेतक-यांची धडपड
वाढत्या तापमानामुळे केळीला जबर फटका बसत चालला आहे. यामुळे शेतकरी केळी वाचवण्यासाठी विविध उपाय करत धडपड करतांना दिसत आहेत. यात बांधावर साडी कपडा लावणे, विविध काड्यांचे आधार बांधणे, घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, हिरवेगार नेट लावत आहे. काही शेतकरी घडांवर स्प्रे सुद्धा मारत आहे.

Web Title: fungal diseases on banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.