खान्देशात शास्त्रीय गायन रुजविण्याचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:25 PM2018-03-10T22:25:21+5:302018-03-10T22:25:58+5:30

बासरी वादक विवेक सोनार : स्थानिक कलावंतांना देणार प्रोत्साहन

The goal of creating classical singing in the field | खान्देशात शास्त्रीय गायन रुजविण्याचे ध्येय

खान्देशात शास्त्रीय गायन रुजविण्याचे ध्येय

Next
ठळक मुद्देपंडित विवेक सोनार यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून बासरी वादनाचा रियाज सुरू केला. प्रारंभीचे धडे त्यांनी चाळीसगाव येथेच ज्येष्ठ बासरी वादक स्व.पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर यांच्याकडे गिरविले. त्यांच्या सूचनेवरुनच पुढे विवेक सोनार यांनी मुंबई गाठून पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्यत्व पत्करले. गेल्या २० वर्षांपासून सोनार हे पंडित चौरसि अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी पंडितजींना साथसंगतही केली आहे. विवेक सोनार यांनी भारतासह १० देशांमधील श्रोत्यांना बासरी वादानाने मंत्रमुग्ध केले आहे. जूनमध्ये मोरोक्को देशात ते बासरीचे सूर छेडणार आहेत.

जिजाबराव वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.११ : शास्त्रीय गायन आणि संगीताची आराधना कठीण आहे. एखाद्या व्रतस्थासारखे त्यात झोकून द्यावे लागते. बहुतांशी गोष्टीत खान्देश आघाडीवर असला तरी शास्त्रीय गायन, संगीतात मात्र मोठी पिछाडी आहे. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे यावर कृतीयुक्त काम केले जाणार असून, ही कला इथल्या उदयोन्मुख कलावंतांमध्ये रुजविण्याचे ध्येय असल्याचे मत बासरी वादक पंडित विवेक सोनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न : खान्देशाची निवड का केली?
विवेक सोनार : चाळीसगावचा मी भूमिपुत्र. त्यामुळे एकूणच खान्देशाविषयी जिव्हाळा आहे. मोठ्या महानगरात शास्त्रीय गायन, संगीताचे अनेकविध कार्यक्रम होतात. चळवळीदेखील सक्रिय आहेत. त्या मानाने खान्देशात ही उणिव ठळकपणे दिसते. यासाठीच शास्त्रीय गायनाची रुजूवात येथे करावयाची आहे.
प्रश्न : आपले नियोजन कसे आहे?
उत्तर : शास्त्रीय गायन शिकणारे इच्छुक साधक हेरुन त्यांना गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे व्यासपीठ मिळवून दिले जाईल. चाळीसगाव हेच मुख्य केंद्र असेल. दर तीन महिन्यांनी गुरुकुल संगीत सभेचे आयोजन करून साधकांना मार्गदर्शन आणि शास्त्रीय गायनाचे धडे दिले जातील. ज्येष्ठ कलावंतांच्या उपस्थित त्यांच्या खान्देशात ठिकठिकाणी मैफिली होतील.
प्रश्न : स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काय करणार?
उत्तर : दर तीन महिन्यांनी कार्यक्रम झाल्याने साधकांचा उत्साह वाढेल. श्रोतावर्गही तयार होईल. तसे बघितले तर येथील श्रोत्यांमध्येही उदासिनता दिसून येते. अर्थात नियमित कार्यक्रम झाले तर चांगले परिणामही दिसतील. स्थानिक कलावंत चांगल्याप्रकारे तयार झाल्यानंतर गुरुकुलतर्फेच मोठ्या शहरांमध्ये वार्षिक संगीत सभेत त्यांना नामवंत कलावंतांबरोबर गायनाची संधी दिली जाईल.
प्रश्न : होतकरू साधकांसाठी काही नियोजन आहे का?
उत्तर : संगीत ही साधना आहे. ती आनंदाने रोमांचित करणारी दिव्य अनुभूती आहे. कलेला वाहून घेणाºया साधकांच्या मागे गुरुकुल प्रतिष्ठान भक्कमपणे उभे राहील. यासाठी संगीत कार्यशाळा घेणे, शिष्यवृत्ती देणे, सांगितिकदृष्ट्या साधकांना दत्तक घेणे, अशी मदत केली जाणार आहे. खान्देशातील साधकांसाठी पहिली संगीत सभा जूनमध्ये होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी गुरुकुल प्रतिष्ठान डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करावे.
प्रश्न : गुरुकुल प्रतिष्ठान कोणते उपक्रम राबविते?
उत्तर : २०११ मध्ये चाळीसगाव येथे गुरुकुल प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ स्वत: पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी रोवली आहे. अर्पण, स्वरांजली, आदरांजली, बासरी उत्सव, फ्युल्ट सिंफनी, बासरी फेस्टीवल, बासरी वादन शिकण्याचा अ‍ॅप, ज्येष्ठ गायकांना पुरस्कार असे उपक्रम राबविते. बासरी अ‍ॅपमुळे २० देशातील इच्छुक साधक बासरी वादन शिकत आहे. नागरिकांनी आर्थिक पाठबळ दिले तर हे काम अधिक पुढे जाणार आहे. गेल्या काही वर्षात गुरुकुलच्या उपक्रमांमुळे खान्देशातील काही साधकांनी चांगली प्रगती केली आहे.

 

Web Title: The goal of creating classical singing in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.