इंधन दरवाढीतून सरकारने १२ लाख कोटींचा गल्ला भरला - मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 15:06 IST2018-10-04T13:22:58+5:302018-10-04T15:06:58+5:30
कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस सुरुवात

इंधन दरवाढीतून सरकारने १२ लाख कोटींचा गल्ला भरला - मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
फैजपूर, जि. जळगाव : सरकारने इंधन दरवाढी करून सामान्यांना वेढीस धरले असून यातून सरकारने १२ लाख कोटींचा गल्ला भरला असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी फैजपूर येथे केला. दरवाढीतून मिळालेल्या महसुलाचा फायदा शेतकऱ्यांनाही होऊ दिला नसल्याचे ते म्हणाले.
कॉँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याची सुरुवात गुरूवारी ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाली. यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आणि ५० आमदार उपस्थित आहेत. यात्रेच्या शुभारंभप्रसंगी खरगे यांनी आपल्या भाषणातून भाजपा सरकारचा चांगलाच समाचार घेतला.