पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, मला आश्वासन देण्याची सवय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 03:46 PM2019-05-18T15:46:31+5:302019-05-18T15:47:51+5:30

मला चंद्र दिला, सूर्य दिला, असे आश्वासन सभेत देण्याची सवय नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, मंगरूळ येथे गिरीश महाजन यांनी पाडळसरे धरणाच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले या नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Guardian Minister Chandrakant Patil says, I do not have a habit of assurance | पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, मला आश्वासन देण्याची सवय नाही

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, मला आश्वासन देण्याची सवय नाही

Next
ठळक मुद्देमंगरूळ येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेटपालकमंत्र्यांनी म्हटले पाणी फाऊंडेशनचे भजन

अमळनेर, जि.जळगाव : मला चंद्र दिला, सूर्य दिला, असे आश्वासन सभेत देण्याची सवय नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, मंगरूळ येथे गिरीश महाजन यांनी पाडळसरे धरणाच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले या नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मंगरूळ च्या सरपंच हर्षदा पाटील यांनी तापी नदीवरून पाणीपुरवठा योजना मागितली. तसेच टँकर वाढवून देण्याची मागणी केली, तर आनोरे येथील बाजीराव पाटील यांनी दुष्काळामुळे गाव सोडल्याचे सांगितले. ५० टक्के लोक पाण्यामुळे गाव सोडून निघाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालक मंत्र्यांनी विनंती केल्यानंतर साहेबराव महाराज यांनी पाणी फौंडेशनचे भजन म्हटले. त्याला पालकमंत्र्यांनी टाळ वाजवून साथ दिली. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीदेखील भजनाला साथ दिली. तसेच पालकमंत्र्यांनी लहान मुलांना चॉकलेट वाटप केले.
अनोरे गावाला पाणी फौंडेशनसाठी डिझेलला पैसे अपूर्ण पडू देणार नाही, असे सांगितल,े तर पाण्याचे टँकर वाढवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. चारा छावणी मागितल्यास संस्थेला देऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Guardian Minister Chandrakant Patil says, I do not have a habit of assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.