जळगाव शहरात मेहुण्याचा शालकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:22 PM2018-02-08T16:22:45+5:302018-02-08T16:24:07+5:30
किरकोळ उसनवारीच्या पैशावरुन समाधान गणपत वाघ या मेहुण्याने शालक योगेश नथ्थू कापसे (वय ४०) यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता अयोध्या नगर परिसरातील हनुमान नगरातील नाल्याकाठी घडली. गंभीर जखमी झालेल्या योगेश याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,८ : किरकोळ उसनवारीच्या पैशावरुन समाधान गणपत वाघ या मेहुण्याने शालक योगेश नथ्थू कापसे (वय ४०) यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता अयोध्या नगर परिसरातील हनुमान नगरातील नाल्याकाठी घडली. गंभीर जखमी झालेल्या योगेश याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, योगेश कापसे व समाधान वाघ हे सख्खे एकमेकाचे शालक व मेहुणे आहेत. गुरुवारी दुपारी हनुमान नगरातील नाल्याकाठी तृप्ती पान टपरीजवळ थांबलेले असताना दोघांमध्ये पैशावरुन वाद झाला. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. यावेळी समाधान याने जवळच पडलेले लोखंडी पट्टी उचलून योगेश यांच्या डोक्यात घातली. सपासप वार झाल्याने योगेश जागेवरच बेशुध्द पडला. रस्त्यावर रक्ताचा सडा पाहून उपस्थित लोकांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी मेहुणा समाधान वाघ ताब्यात घेण्यात आले असून जखमीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.