जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:50 AM2017-12-28T11:50:54+5:302017-12-28T12:44:37+5:30

पाणी प्रश्नांसंदर्भात बैठक

Irrigation Department fail planing | जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका

जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका

Next
ठळक मुद्देपाणी आवर्तनाची पूर्तता होईनाआंदोलन नाही, कॅनॉलच तोडणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- जिल्ह्यात पाण्याचे आवर्तन सोडण्याची पूर्तता तर होत नाही व पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर दुरावस्था झालेल्या चा:यांमुळे बहुतांश पाणी वायाच जाते. यास   जलसंपदा विभागाचा नियोजन शून्य कारभार कारणीभूत असून जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टीका शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी बुधवारी केली. 
पाचोरा-भडगाव तालुक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला  आमदार  किशोर पाटील हेदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गिरणा धरणातून दोन आवर्तन सोडण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात यापूर्वी तीन-तीन वेळा आवर्तन सोडले जात होते. त्यामुळे पाचोरा-भडगाव परीसरातील शेतक:यांना शेतीला पाणी मिळत होते. 
त्यात आता कापसावरील बोंडअळीमुळे कृषी विभागाने कापूस उपटून टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शेतक:याला फरदडही घेता येत नाही. अशात पाणी आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचा गलथान कारभार असून दोनच आवर्तन सोडणार असल्याने 50 टक्के शेतक:यांनी अर्जच भरले नसल्याचे त्यांनी सांगितले. 
पाचोरा-भडगाव परिसरात कालव्यांचीदेखील दुरूस्ती झालेली  नसून चा:यांनाही गळती लागली  असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जलसंपदा विभागाची ऐपत नसेल तर आमदार निधीतून या चारी दुरूस्त करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे ते म्हणाले.  त्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. 
बहुळा धरण ज्यावेळी बांधले गेले त्यावेळी त्याच्यावर धरण नव्हते. मात्र आता बहुळा धरणाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. नवीन कामांचे सोडा पण  जिल्ह्यात जे जुने प्रकल्प आहेत ते तरी पूर्णत्वास नेले पाहीजे असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. आवर्तन सोडूनही शेतक:याला यंदा रब्बी पीक घेता येणार नसल्याचे ते म्हणाले.  
जलसंपदा खात्याचे मंत्री आपल्याच जिल्ह्याचे असूनही अशी दुरवस्था का, असा प्रश्न आमदार पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, मी त्यांच्याबद्दल नाही जलसंपदा विभागाबाबत बोलत आहे, असे सांगून त्यांनी राज्याचा जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टिका शेवटी केली.  

आंदोलन नाही, कॅनॉलच तोडणार
पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण आंदोलन, उपोषण वैगेरे काही करणार नाहीतर थेट कॅनॉल तोडू, असा इशारा आमदार पाटील यांनी या वेळी दिला. 

Web Title: Irrigation Department fail planing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.