जळगाव शहरात अधिका-याची नगरसेविकेला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 09:29 PM2018-02-20T21:29:51+5:302018-02-20T21:33:45+5:30
वॉर्डातील स्ट्रीट लाईट व नवीन पोल उभारणीचा विषय महासभेत का घेतला नाही? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांना मनपाचे लाईट विभागप्रमख एस.एस.पाटील यांनी शिवीगाळ व दमटाटी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी २.३० वाजता गणपती नगरात घडला. याबाबत नगरसेविका चव्हाण यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२१: वॉर्डातील स्ट्रीट लाईट व नवीन पोल उभारणीचा विषय महासभेत का घेतला नाही? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांना मनपाचे लाईट विभागप्रमख एस.एस.पाटील यांनी शिवीगाळ व दमटाटी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी २.३० वाजता गणपती नगरात घडला. याबाबत नगरसेविका चव्हाण यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्योती बाळासाहेब चव्हाण या वॉर्ड क्रमांक २९ मध्ये नगरसेविका आहे. वॉर्डातील स्ट्रीटलाईट व नवीन पोल उभारणीचा विषय महासभेत घ्यावयाचा होता तो घेतला गेला नाही म्हणून चव्हाण या मनपाची महासभा संपल्यावर पती बाळासाहेब चव्हाण यांना घेऊन गणपती नगरातील लाईट विभागाच्या कार्यालयात गेले असता, तेथे लाईट विभागप्रमुख एस.एस.पाटील यांना त्यांना जाब विचारला. त्यावरुन पाटील यांनी नगरसेविका चव्हाण यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. तसेच पती बाळासाहेब चव्हाण यांच्यावर हात उगारून त्यांना देखील धमकी दिली.