Kerala Floods : केरळच्या मदतीसाठी सरसावल्या जळगावातील धार्मिक, सामाजिक संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:58 PM2018-08-25T12:58:40+5:302018-08-25T12:59:41+5:30
ओंकारेश्वर देवस्थानतर्फे दोन लाख
जळगाव : केरळ राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगावातील धार्मिक व सामाजिक संस्था सरसावल्या आहेत.
ओंकारेश्वर देवस्थान
ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमध्ये दोन लाख रुपयांचा निधी पाठविण्यात आला. त्याचा डिमांड ड्रॉफ्ट नुकताच पाठविण्यात आल्याचे संस्थानचे व्यवस्थापक दीपक जोशी यांनी पत्रकाद्वारे कळविले. जिल्ह्यातील सर्व सामाजिक व धार्मिक संस्थांनीही मदत करावी, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
आॅल इंडिया पायाम - ए - इंसानियत
आॅल इंडिया पायाम - ए - इंसानियत फोरमच्या जळगाव शाखेतर्फे ठिकठिकाणाहून रोख व इतर आवश्यक साहित्य जमा करण्यात आले. ईदगाह मैदान व विविध मशिदींमध्ये रोख रक्कम जमा करण्यात येऊन ते सर्व केरळला पाठविण्यात आले.