जळगावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले पोलिसाचे प्राण

By admin | Published: July 16, 2017 12:33 PM2017-07-16T12:33:35+5:302017-07-16T12:33:35+5:30

वाहने आडवे लावून कार थांबवून सोनवणेंची सुटका केली.

Police's survival in the wake of alertness of citizens in Jalgaon | जळगावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले पोलिसाचे प्राण

जळगावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले पोलिसाचे प्राण

Next
लाईन लोकमतजळगाव, दि. 16 - पोलीस लिहिलेली प्लेट पाहून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एक कार अडविली. चालकाकडे कोणतीच कागदपत्रे नसल्याने डय़ुटीवर असलेल्या वाहतूक शाखेचे कर्मचारी संतोष वामन सोनवणे यांनी कारमध्ये बसून कार वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेण्यास सांगितले असता मागे बसलेल्या एकाने दरवाजे लॉक करुन सोनवणे यांना दाबून धरले तर चालकाने भरधाव वेगाने कार पाळधीच्या दिशेन पळविली. घारबलेल्या सोनवणे यांनी लाथ मारुन दरवाजा उघडला व आरडाओरड केली. हा प्रकार पाहून प्रभात चौकात थांबलेल्या तीन जणांनी कारचा पाठलाग केला व आयटीआयजवळ वाहने आडवे लावून कार थांबवून सोनवणेंची सुटका केली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाहतूक पोलिसाचे प्राण वाचले.सोनवणे यांनी जोराने लाथमारुन दरवाजा उघडला व दरवाजाला पाय लावून धरत आरडा ओरड केली. प्रभात चौकाच्या पुढे रस्त्यावर थांबलेले सर्वसामान्य नागरिक असलेल्या अनिल प्रकाश सपकाळे, मच्छींद्र उत्तम सोनवणे व रामचंद्र सोनवणे यांनी हा प्रकार कारचा पाठलाग केला. आयटीआयजवळ दुचाकी आडव्या लावून कार थांबवून सोनवणे यांची सुटका केली. यावेळी कारमधील अरविंद भाई नावाचा तरुण पसार झाला. येणारे जाणारे थांबत असल्याने या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. वाहतूक शाखेचे संतोष शिंदे, शिवाजी माळी,महेंद्र पाटील, रवी इधाटे, सहायक फौजदार गुलाब मनोरे व नरेंद्र बागुल यांनी घटनास्थळी गाठून कारसह आरोपींना वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणले.आकाशवाणी चौक जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने या तोतया पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासमोर दोघांना हजर करण्यात आले. त्यांची चौकशी केली असता रमेशभाई उखाभाई या नावाचे सुरत पोलिसाचे ओळखपत्र आढळून आले. सोनवणे यांची सुटका झाली ते ठिकाण रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने गायकवाड यांनी संशयितांना कारसह तिकडे पाठविले. आरोपींजवळ असलेली ही कार रमेश भाई यांची असून ते सुरत येथील लिंबायत पोलीस स्टेशनला कार्यरत असल्याचे दोघांकडून सांगितले जात होते. कार व ओळखपत्र खरे की खोटे याची पोलीस चौकशी करीत आहेत. पकडण्यात आलेले अशोक बग्गाभाई रबारी व प्रवीण गोकुळभाई रबारी असे दोघांची नावे सांगत आहेत. आपण सुरत येथे कापड गिरणी व हिरा कारखान्यात काम करतो.नागपूर येथे मित्राला भेटण्यासाठी गेलो होतो असे ते सांगत आहेत. फरार झालेल्या तिस:या साथीदाराचे अरविंदभाई इतकेच ते नाव सांगत आहेत.एकूणच त्यांची माहिती खरी की खोटी हे स्पष्ट झालेले नाही.कारमधील तिन्ही जण शरीराने मजबूत होते. ‘याला पकडून ठेव सोडू नको, पुढे बघू त्याचे कार करायचे‘ असे ते गुजरातीमधून बोलत होते. लाथ मारुन दरवाजा उघडला व त्यामुळे आरडाओरड करता आली व रस्त्यावरील नागरिकांमुळे आपण बचावलो, अन्यथा महामार्गावर भरधाव कारमधून त्यांनी फेकले असते तर आज जीवंत राहिलो नसतो असे सोनवणे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

Web Title: Police's survival in the wake of alertness of citizens in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.