उत्तर महाराष्ट विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 06:45 PM2017-09-16T18:45:38+5:302017-09-16T18:49:48+5:30
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अभिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी खान्देशातील १९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन प्राध्यापक, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या एकूण १८ जागांसाठी ३६ तर १० अभ्यास मंडळाच्या २४ जागांसाठी ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशा एकूण ८३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद होणार आहे.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.१६,उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अभिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी खान्देशातील १९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन प्राध्यापक, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या एकूण १८ जागांसाठी ३६ तर १० अभ्यास मंडळाच्या २४ जागांसाठी ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशा एकूण ८३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद होणार आहे.
विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये विद्यापीठ प्राध्यापकांमधून अधिसभेवर एक, महाविद्यालयीन प्राध्यापकांमधून दहा, व्यवस्थापन प्रतिनिधींमधून अधिसभेवर चार अशा एकूण १५ अधिसभेच्या जागा निवडून दिल्या जाणार आहेत. तर विद्या परिषदेसाठी तीन जागा निवडून दिल्या जाणार आहेत. तसेच अभ्यास मंडळांच्या १० जागांसाठी देखील निवडणूक होत आहे.
१९ मतदार केंद्रावर होणार मतदान
खान्देशातील १९ मतदार केंद्रावर रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. जळगाव जिल्'ातील १०, धुळे ५ तर नंदुरबार जिल्'ातील ४ मतदार केंद्राचा समावेश आहे. निवडणुकीसाठी ३०० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, गुरुवारी कर्मचाºयांना विद्यापीठाकडून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शनिवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठामधून सर्व कर्मचारी व मतदान अधिकारी रवाना झाले. १९ मतदान केंद्राच्या ३३ बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका बुथवर एक मतदान केंद्राध्यक्षासह ९ कर्मचारी कार्यरत राहतील.
इन्फो-
१६ जागा यापूर्वीच झाल्या बिनविरोध
विद्यापीठ प्राधिकरणाच्या एकूण ३७ जागांपैकी १६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये प्राचार्य गटाच्या सर्व म्हणजेच १० जागा बिनविरोध झाल्या. विद्यापरिषदेच्या ३, विद्यापीठ प्राध्यापक गटाच्या २ तर व्यवस्थापन मंडळाची एक जागा देखील बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित ३ जागांसाठी कोणत्याही उमेदवाराने अर्ज न केल्यामुळे या जागा रिक्त राहणार आहेत. १८ जागांसाठी रविवारी मतदान होणार असून, १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
इन्फो-
मतदार गट - जागा - उमेदवार-मतदार
विद्यापीठ प्राध्यापक - १ -२- ८८
महाविद्यालयीन प्राध्यापक - १० -२३- २ हजार ५६०
व्यवस्थापन प्रतिनिधी - ४ -५- ८६
विद्या परिषद - ३ -६-२ हजार ६४८
अभ्यास मंडळ - १० -४७- ३४७