चोरी रोखण्यासाठी वीज वाहिनीला ठिबक नळीचे आवरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 05:16 PM2017-09-24T17:16:49+5:302017-09-24T17:24:05+5:30
माळपिंप्री ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमामुळे गाव झाले आकडेमुक्त
ऑनलाईन लोकमत
पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर दि. 24 : तालुक्यातील माळपिंप्री येथे वीज चोरीला आळा बसविण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढविली. गावातील वीज वाहिन्यांना ग्रा.पं.ने स्वखर्चातून ठिबक नळ्या बसवित गाव संपूर्ण गाव आकोडे मुक्त केले आहे.
राज्यभरात रोहित्र ते ग्राहक यांच्या घरार्पयत वीज पुरवठा करणा:या वीज वाहिन्या उघडय़ा आहेत. त्यामुळे या वीज वाहिनींवर आकोडे टाकून वीज चोरी होत असते. वीज चोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनी उपाययोजना केल्या जात असताना चोरी सुरूच आहे.
माळपिंप्री ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार
माळपिंप्री गावातील नागरीकांनी वीज चोरी न करता आपल्या कडील वीज बील वेळेत भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. आपलं गाव आकोडे मुक्त करावं, त्यासाठी लागणारा निधी ग्रामपंचायत देईल असा निर्णय मिटींग मध्ये घेण्यात आला.
सव्वा तीन हजार मीटर ठिबक नळीचे आवरण
माळपिंप्री ग्रामपंचायतीतर्फे गावातील 40 वीज खांबामधील सुमारे 3 हजार 300 मीटर अंतरातील वीज तारांमध्ये 18 हजार रुपए किंमतीची ठिबक नळी टाकण्यात आलेली आहे. ग्रा.पं.मिटींगमध्ये ठरल्याप्रमाणे संपूर्ण गाव आकोडे मुक्त झाले आहे. यासाठी महात्मा गांधी तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष एस.टी.पाटील, ग्रा.पं.सदस्य भगवान पाटील, विकास शिरकांडे, प्रवीण पाटील,अशोक इंगळे, बापू काळबैले , ग्रामसेवक ईश्वर भोंडे, सोपान पाटील, ईश्वर कोळी, सुरेश पाटील, वीज वितरण कंपनीचे हेमंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.
वीज तारेपासून स्वत:आकोडे मुक्त होणारे माळपिंप्री हे गाव राज्यातील एकमेव गाव असावे. आता आम्ही भारनियमन मुक्त गावासाठी प्रय}शील राहणार आहोत. त्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार महत्वाचा आहे.
लक्ष्मी पाटील, सरपंच माळपिंप्री.