धक्कादायक...धुपे येथे पुतण्याने केला काकूवर अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:33 AM2017-12-07T11:33:20+5:302017-12-07T11:49:30+5:30
मोबाईल लावून देण्याचा बहाणा करीत नाल्यात ओढत केला अतिप्रसंग
आॅनलाईन लोकमत
चोपडा,जि.जळगाव,दि.७ : तालुक्यातील धुपे खुर्द येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. रस्त्याने नातवासोबत जाणाºया काकूला मोबाईल लावून देतो, असा बहाणा करीत नाल्यात ओढून घेऊन तिच्यावर मंगळवारी बलात्कार केला.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, ५ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास धुपे खुर्द शिवारातील रस्त्यावर लहानग्यांसोबत घरी जात असलेल्या काकूला बोलवून तुला फोन लावून देतो, असा बहाणा करीत बाजूला असलेल्या नाल्यात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला.
याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून ४५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादीवरून २५ वर्षीय नराधमाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भाग पाच, गुरनं. ६२/१७, भां.दं.वि. कलम ३७६ (२अ) , ३२९ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेची फिर्याद चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांनी घेतली. आरोपी फरार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाना दाभाडे तपास करीत आहेत.