सुरेशदादांचा डॉ.सतीश पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:22 PM2017-10-05T23:22:24+5:302017-10-05T23:24:56+5:30
उपोषणस्थळी दिली भेट : राजकीय पक्षाचा नव्हे तर माणुसकीचा हा विषय-सुरेशदादा
आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.५- राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी पारोळा, एरंडोल तालुक्यातील पाणीटंचाईच्या विषयावर सुरू केलेलेउपोषणहा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही. जिल्'ातच परिस्थिती बिकट असून शेतकरी अडचणीत आहेत. माणुसकीच्या नात्याने आमदार डॉ.पाटील यांनी गिरणेचे पाणी सोडण्याच्या केलेल्या मागणीला माझा पाठींबा असल्याचे मत माजी मंत्री व शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणस्थळी जाऊन आ.डॉ.पाटील यांची भेट घेतल्यावर व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन लढ्ढा हे देखील उपस्थित होते. पारोळा, एरंडोल तालुक्यातील पाणी टंचाईची बिकट परिस्थिती लक्षात घेता गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली आहे. ती मागणी पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासही ४ आॅक्टोबरपासून प्रारंभ केला आहे. दरम्यान शिवसेनेनेही बुधवारी सर्व आमदारांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. त्यात सुरेशदादांनी जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर सुरेशदादांनी गुरूवारी सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळी जाऊन आमदार डॉ.पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला व उपोषणाला पाठींबा जाहीर केला. यावेळी नगरसेवक अमर जैन हे देखील त्यांच्यासोबत होते. सुरेशदादांनी तब्बल २० मिनिटे उपोषणस्थळी व्यासपीठावर थांबून आमदार डॉ.पाटील तसेच राष्टÑवादीच्या इतर पदाधिकाºयांशी चर्चा केली. यावेळी हास्यविनोदही झाले. सुरेशदादा सांगतील ती पूर्व दिशा यावेळी जिल्हा बँक सदस्य संजय पवार यांनी यापूर्वीही सुरेशदादा म्हणतील तीच जिल्'ासाठी पूर्व दिशा ठरत होती. यापुढेही सुरेशदादा सांगतील त्याच दिशेने वाटचाल करू. आमदार डॉ.पाटील हे देखील सुरेशदादांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करण्याचा प्रयत्न करतील असे सांगत सुरेशदादांना मनोगत व्यक्त करण्याचा आग्रह केला. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करू-सुरेशदादा १.उपोषणस्थळी राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांच्या आग्रहावरून मनोगत व्यक्त करताना सुरेशदादा म्हणाले की मला मनापासून आमदार डॉ.पाटील यांच्या या उपोषणाला सहकार्य करण्याची भूमिका मांडायची आहे. कारण त्यांचे हे उपोषण वैयक्तिक कारणासाठी नाही. तर पारोळा, एरंडोल तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आहे. २.जिल्'ातच संकट आहे. ते दूर करण्याची मागणी आम्हीही केली आहे. त्यामुळे पाठींबा देण्यासाठी आलो. हा कुठल्याही पक्षाचा विषय नाही. माणुसकीच्या नात्याने जे व्रत घेतले, त्याला नैतीक पातळीवर पाठींबा आहे. ३.गरज लागेल तेव्हा मी तसेच शिवसेनाही सोबत राहील. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशीही या विषयावर चर्चा करणार असून हा प्रतिष्ठेचा प्रश्न न करता पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी करणार आहे. त्यामुळे उपोषण लवकरच संपेल, अशी आशा असल्याचे सांगितले.