जळगाव शहरातील ज्वेलर्सच्या दुकानात चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:53 AM2018-05-22T11:53:34+5:302018-05-22T11:53:34+5:30
शहराचा मध्यवर्ती व सतत वर्दळीचा भाग असलेल्या गोलाणी मार्केट परिसरातील जोशी बंधू ज्वेलर्स या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. दुकानात दागिने किंवा रोकड नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२२ : शहराचा मध्यवर्ती व सतत वर्दळीचा भाग असलेल्या गोलाणी मार्केट परिसरातील जोशी बंधू ज्वेलर्स या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. दुकानात दागिने किंवा रोकड नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गोलाणी मार्केटमध्ये ‘लोकमत’ कार्यालयाच्या समोर विनित विजय जोशी (वय ४५, रा.नवी पेठ, जळगाव) यांच्या मालकीचे जोशी बंधी ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानात फक्त मोेत्याचेच दागिने विक्री केली जातात. सोने किंवा चांदीचे दागिने या दुकानात नाहीत. नेहमी प्रमाणे दररोज रात्री आठ ते नऊ वाजता हे दुकान बंद होते.
शटरची कडी तोडली, कुलूप ‘जैसे थे’
वृत्तपत्र विक्रेता तरुण जोशी यांच्या दुकानात शटर खालून पेपर टाकायला गेला असता त्याला शटरची कडी तुटलेली दिसली तर कुलुप जैसे थे दिसले. चोरीचा प्रकार झाल्याचा संशय आल्याने त्याने विनित जोशी यांना घटनेची माहिती दिली.
दागिने सुरक्षित,मात्र कपाटाचे नुकसान
चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर दागिने तपासले,मात्रे ते सोने किंवा चांदीचे नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या दागिन्यांना हातही लावला नाही. कपाटात पैसे असावेत म्हणून त्यांनी कपाट व ड्रावर फोडले आहे. त्यातही पैसे नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दुकानातील मोत्याचे सर्व दागिने जसेच्या तसे शिस्तीत लावलेले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. फिंगर प्रिंट तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.