धानोरा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By admin | Published: May 23, 2017 12:32 PM2017-05-23T12:32:32+5:302017-05-23T12:33:11+5:30
स्टेअरिंग रॉड तुटल्याने, ट्रक दुचाकीवर जाऊन धडकला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
Next
ऑनलाईन लोकमत
धानोरा,ता.चोपडा,दि.23- स्टेअरिंग रॉड तुटल्याने, ट्रक दुचाकीवर जाऊन धडकला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अंकलेश्वर-ब:हाणपुर महामार्गावरील धानोरा येथील आस्थानगरजवळ झाला.
धानो:याहून चोपडय़ाकडे कपाशी घेऊन जाणारा ट्रक (एमपी 09-एचएफ 5576) कमळगावहून धानो:याकडे येणा:या दुचाकीवर (एमएच 19- बीएल 0723) आदळला. यात अशोक चैत्राम न्हायदे (60) हे जागीच ठार झाले. तर राजेंद्र भास्कर बागूल (45, दोन्ही रा.कमळगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमी बागूल यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
ट्रक तोडफोडीचा प्रय}
अपघातामुळे जमाव संतप्त झाला. काहींनी ट्रकची तोडफोड करण्याचा प्रय} केला. यात ट्रकचे काच फोडण्यात आले. मात्र वेळीच संतप्त जमावाला शांत केल्याने, अनर्थ टळला. दरम्यान अपघातानंतर अडावद पोलीस 45 मिनीटांनी दाखल झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तोर्पयत मृतदेह रस्त्याच्या कडेलाच पडून होता. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.