Video : मतदारयादीत मृत दाखवलं, काँग्रेसने जिवंत मतदाराची प्रेतयात्राच काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 03:20 PM2019-04-23T15:20:35+5:302019-04-23T15:21:42+5:30

लोकसभा निवडणुकांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मोहनसिंग चिंधू गणबास व श्रीकृष्ण संपत शेकोकार हे गोविंद विष्णू महाजन विद्यालयावरील बूथ क्र. 166 वर मतदान करण्याकरीता गेले होते.

Video: In the electoral rolls, Congress has created a funeral procession of the living voter | Video : मतदारयादीत मृत दाखवलं, काँग्रेसने जिवंत मतदाराची प्रेतयात्राच काढली

Video : मतदारयादीत मृत दाखवलं, काँग्रेसने जिवंत मतदाराची प्रेतयात्राच काढली

googlenewsNext

मनोज पाटील

मलकापूर - जिवंत असतानाही मतदार यादीत मृत दाखविण्यात आल्याने मतदानापासून वंचित राहावे लागणार ! पण का ? या बाबीचे समाधानकारक सहकार्य न मिळाल्याने अखेर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून "त्या" जिवंत मतदाराची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. या प्रेतयात्रेतून निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करण्यात आल्याची घटना मलकापुरात आज 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना घडली.

लोकसभा निवडणुकांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मोहनसिंग चिंधू गणबास व श्रीकृष्ण संपत शेकोकार हे गोविंद विष्णू महाजन विद्यालयावरील बूथ क्र. 166 वर मतदान करण्याकरीता गेले होते. मात्र, मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट असतानाही नावासमोर मृत दाखविण्यात आल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार ? ही बाब उमजली. परीणामतः या घोळामुळे मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. या बाबीची दखल नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी घेत थेट गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणातवरील मतदान केंद्रावर धडक दिली. येथे मतदान केंद्रावरील मतदान यादीत त्या मतदाराचे नाव व फोटो होता. परंतु त्यापुढे व्हॅलीयर डिलीट अर्थात जिवंत माणसाला त्या रेकॉर्डनुसार मृत दाखविण्यात आले होते.

यासंदर्भात अॅड. रावळ यांनी बिएलओकडे व नंतर झोनल ऑफिसरकडे चौकशी केली. तद्वतच नायब तहसीलदार विजय पाटील यांना याबाबत जाब विचारला असता आता निवडणुकीचा काळ आहे. यासंदर्भात संध्याकाळी वरिष्ठांकडे तक्रार करू तसेच चौकशी करू असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, आता त्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार या बाबीने येथे जोर धरला व आंदोलनाचा ज्वर चढला. मोहनसिंग गणबास या जिवंत मतदाराला तिरडीवर झोपवण्यात आले व ज्या पद्धतीने मृतकाला तिरडीवर बांधले जाते. त्या पद्धतीने या जिवंत मतदाराला ही बांधण्यात आले. चार खांदे करी यांनी खांदे देत तिर्डी रथयात्रेत ठेवली. स्वामी विवेकानंद आश्रमाजवळून ही अंत्ययात्रा टिटव धरून बसस्थानका जवळून बुलढाणा रोड मार्गे थेट तहसील कार्यालयावर धडकली. 

दरम्यान डफळयांच्या निनादात निवडणूक आयोग मुर्दाबाद... शासन -प्रशासनाचा धिक्कार असो.. अशा घोषणाही देण्यात आल्या. अंत्ययात्रा तहसील कार्यालयात धडकताच सदर प्रतिकात्मक अंत्ययात्रा रथातील प्रेत तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले. येथे आधीच उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे व पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड चमूसह तैनात होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये या बाबीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्ते यांना अटक करीत पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले व या आंदोलनकर्त्यांवर 168, 169, 135 सीआरपीसी नुसार गुन्हा दाखल केला. या आंदोलनात काँग्रेस नेते तथा नगराध्यक्षअॅड. हरीश रावळ सह काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, अनिल गांधी, अनिल बगाडे, सूनील बगाडे, किशोर गणबास, गजानन ठोसर, नितीन परसे, गोपाल कावसकार, भाऊसिंग शिराळे, मंगलसिंग गणबास, दिलीप काकडे यासह इतर सहभागी झाले होते.

Web Title: Video: In the electoral rolls, Congress has created a funeral procession of the living voter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.