विष प्राशन केलेल्या वाकोदच्या तरुणाचा जळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 04:10 PM2018-02-12T16:10:42+5:302018-02-12T16:12:19+5:30
वाकोद, ता.जामनेर येथील कैलास बाबुराव पांढरे (वय ३४) या तरुणाचा सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. कैलास याने ४ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते.
ठळक मुद्देदहा दिवसापूर्वी घेतले विष एका पायाने अपंग होता तरुण पत्नीचा रुग्णालयात आक्रोश
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : वाकोद, ता.जामनेर येथील कैलास बाबुराव पांढरे (वय ३४) या तरुणाचा सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. कैलास याने ४ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते. त्यादिवसापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. कैलास हा अपंग होता व टेलर काम करायचा. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे. कैलासचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने प्रचंड आक्रोश केला. अन्य नातेवाईकांनी त्यांना धीर दिला.