88 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:00 PM2018-04-27T12:00:45+5:302018-04-27T12:00:45+5:30
पाणीटंचाई : अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 43 गावांना टँकरद्वारे पाणी
Next
ठळक मुद्देअमळनेर तालुक्यात 20 टँकरने पाणी पुरवठा97 गावांमध्ये 257 विंधन विहिरी
ज गाव : वाढत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रताही वाढतच आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवून टंचाईग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तातडीची उपाययोजना म्हणून 88 गावांमध्ये 55 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. तर 159 विहिरींचे अधिग्रहण करून 160 गावांची तहान भागविली जात आहे. सध्याच्या आकडेवाडीनुसार अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 43 गावांना टँकरने पाणी पोहचवावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार अमळनेर तालुक्यातील 43 गावांमध्ये तर त्या खालोखाल जामनेर तालुक्यात 22, पारोळा तालुक्यात 15 गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ विविध उपाय योजले आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून जिल्ह्यातील 97 गावांमध्ये 257 विंधन विहिरी करण्यात आल्या. तालुकानिहाय संख्या अशी आहे. कंसात गावांची संख्या दर्शविली आहे. जळगाव- 51 (18), धरणगाव- 58 (24), एरंडोल- 15 (1), भुसावळ - 27(10), यावल-2 (1), रावेर- 8 (7), मुक्ताईनगर- 2 (2), बोदवड- 13 (5), पाचोरा- 50 (16), अमळनेर - 3 (2), पारोळा- 10 (5), चोपडा- 18 (6).अमळनेर तालुक्यात 20 टँकरने पाणी पुरवठापाणी पुरवठय़ासाठी तालुकानिहाय टँकरची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव - 1, जामनेर -18, एरंडोल- 1, भुसवाळ- 2, मुक्ताईनगर- 1, बोदवड- 1, पाचोरा- 1, चाळीसगाव- 1, अमळनेर,20, पारोळा- 9.