जळगावात 26 रोजी शून्य सावली दिवस
By admin | Published: May 22, 2017 03:51 PM2017-05-22T15:51:50+5:302017-05-22T15:51:50+5:30
शून्य सावली दिवस जळगावकरांना 26 मे रोजी ही घटना अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली.
Next
जळगाव, दि.22 - सनडायल (सावलीच्या घडय़ाळ) नुसार 12 वाजता व हातातील घडय़ाळानुसार 12 वाजून काही मिनिटांनी सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली पायाजवळ पडते. निसर्गाच्या या अद्भूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘ङिारो श्ॉडो डे’ असे म्हणतात. जळगावकरांना 26 मे रोजी ही घटना अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली.
असे रोज का घडत नाही..
पृथ्वीवर तीन काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीच्या मध्य रेषेला विषुववृत्त म्हणतात. या रेषेच्यावर उत्तरेस 23.5 अंशावर असलेल्या रेषेला कर्कवृत्त आणि मध्य रेषेच्या खाली दक्षिणेस 23.5 अंशावर असलेल्या रेषेला मकरवृत्त म्हणतात. 21 मार्च रोजी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर असतो. त्यावेळी तो शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो. त्याला आपण उत्तरायण म्हणतो. सूर्य +23.5 अंश उत्तरेस जातो. परत फिरून 22 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर येतो. त्यावेळी सूर्य शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो दक्षिणेकडे सरकायला लागतो त्याला आपण दक्षिणायन म्हणतो. सूर्य -23.5 अंश दक्षिणेस जातो. हे उत्तरायण व दक्षिणायनच्या काळात घडत असते.
सूर्य रोज वेगवेगळ्या अक्षांशावर उगवतो. इंग्रजीत त्याला ‘सन डेक्लीनेशन’ असे म्हणतात. प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. आपण कर्कवृत्ताच्याजवळ राहतो. जळगाव 21.0 अंश उत्तर या अक्षांशावर आहे. 21 मार्च ते 21 जून या काळात 26 मे रोजी सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून त्यादिवशी आपल्या शहरात 12 वाजून 25 मिनिटांनी ‘ङिारो श्ॉडो डे’ असतो.
21 जूननंतर परतीच्या प्रवासात 18 जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन परत आपल्या अक्षांशाइतके असते त्यावेळी दुस:यांदा आपल्याकडे ‘ङिारो श्ॉडो डे’ असतो. अशा पद्धतीने वर्षातून दोन वेळा सूर्य 12 वाजून 25 मिनिटांनी आपल्या डोक्यावर येतो.
काही शहरांमधील शून्य सावलीचे दिवस आणि वेळ
सांगली- 7 मे, (12.30 मि.), लातूर- 13 मे (12.20 मि.), पुणे- 13 मे (12.31 मि.), मुंबई- 15 मे (12.35 मि.), नाशिक- 20 मे (12.31 मि.), अमरावती- 25 मे (12.16 मि.), जळगाव- 26 मे (12.25 मि.)
खगोलप्रेमींना संधी
या भौगोलिक घटना प्रात्यक्षिकद्वारे आपण समजून घेऊ शकतो. हे प्रात्यक्षिक 7/1, महाबळ कॉलनी, जळगाव येथे केले जाणार आहे. हा एक वेगळा अनुभव आहे, खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.