पुण्यातील या ५ ऐतिहासिक वास्तू तुम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 02:46 PM2017-10-10T14:46:53+5:302017-10-10T17:56:09+5:30

या वास्तु पाहण्यासाठी पुण्यात अनेक पर्यटकही येतात. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पुण्यातील काही ऐतिहासिक वास्तू आपण आज पाहूया.

Do you know about these 5 historical buildings in Pune? | पुण्यातील या ५ ऐतिहासिक वास्तू तुम्हाला माहित आहेत का?

पुण्यातील या ५ ऐतिहासिक वास्तू तुम्हाला माहित आहेत का?

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारवाड्याला राज्य सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं. गांधीजींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई व कस्तुरबा गांधींचे निधन येथीलच बंदीवासात झाले होते.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. विद्येचे माहेरघर म्हणूनही पुणे प्रसिद्ध आहे. खरेतर कित्येक ऐतिहासिक वास्तूंमुळेच पुण्यातील अनेक तालुके ओळखले जातात. या वास्तु पाहण्यासाठी पुण्यात अनेक पर्यटकही येतात. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पुण्यातील काही ऐतिहासिक वास्तू आपण आज पाहूया.

शनिवारवाडा:

मराठ्यांचे साम्राज्य असलेल्या पेशव्यांचे निवासस्थान शनिवारवाडा म्हणून ओळखलं जातं. भारत सरकारने शनिवारवाड्याला १७ जून १९१९ साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. 

लाल महल:

लाल महल शनिवारवाड्यापासून अगदी ५ मीनिटाच्या अंतरावर आहे. शिवाजी महारांजांचा जन्म या किल्ल्यात झाल्याने किल्ल्याला फार महत्त्व आहे. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. त्या वेळेस शिवरायांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. 

 विश्रामबागवाडा:

पेशवा दुसरा बाजीराव हा विश्रामबागवाडा येथे वास्तव्याला होता. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय आहे. लक्ष्मी रोड येथे असलेला या वाड्याच्या पुढे कपडे खरेदीची मोठी बाजारपेठ आहे. 

सारस बाग:

सारस बागेविषयी तुम्ही फार ऐकलं असेल. अनेक मराठी चित्रपटाचे चित्रिकरण या जागी कण्यात आलं आहे. १७५०मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी  आंबील ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. या तलावावर त्यांनी एक बाग तयार केली. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे नाव सारस बाग असे ठेवले.

आगाखान पॅलेस:

आगाखान पॅलेस इमारत पुण्याच्या पूर्व भागात आहे. १९४२ च्या चळवळीत, या वास्तूमध्ये महात्मा गांधी व त्यांच्या पत्‍नी कस्तुरबा गांधी यांचे येथे वास्तव्य होते. गांधीजींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई व कस्तुरबा गांधींचे निधन येथीलच बंदीवासात झाले होते. याठिकाणी दोघांच्याही येथे समाध्या आहेत.

Web Title: Do you know about these 5 historical buildings in Pune?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.