अर्ध्या रात्री स्मशानभूमीत जाऊन तरूणीने केलं असं काही, लोक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:57 AM2024-03-13T09:57:11+5:302024-03-13T09:57:36+5:30
तरूणीने तिचा हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला. ज्याला अनेक मिलियन लोकांनी पाहिलं.
एका तरूणीने रात्री स्मशानभूमीत जाऊन असं काही केलं ज्यानंतर लोकांनी तिच्यावर टीका केली. तिने सगळं काही कॅमेरात रेकॉर्ड केलं. यावरून नंतर वाद पेटला. लोकांनी तिला खूप विरोध केला. तिने सांगितलं की, ती स्मशानभूमीत कबरींची स्वच्छता करत होती. तरूणीने तिचा हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला. ज्याला अनेक मिलियन लोकांनी पाहिलं.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, व्हिडिओत ती म्हणते की, मी रात्री स्मशानभूमीत कबरींची मोफत स्वच्छता करत आहे. ती सोशल मीडियावर क्लीन गर्ल नावाने फेमस आहे. व्हिडीओ ती एका कबरेची स्वच्छता करताना दिसत आहे. ती त्यावर जमा झालेली धुळ, कचरा बाजूला करते. नंतर ब्रशने त्यांची स्वच्छता करते. या तरूणीने टिकटॉक आणि इन्स्टावर 1 मिलियन फॉलोअर आहेत. ती नंतर कबरेवरील नाव वाचते आणि त्याचा अर्थ सांगते.
ती सांगते की, '23 जुलै 1980 ला बिएनवेनिडा यांचं निधन झालं होतं. त्याची रास मेष होती. माझा सगळ्यात चांगला मित्रही मेष राशीचा होता. मला उत्सुकता आहे की, त्याचं जीवन कसं राहिलं असेल? त्याला चॉकलेट आवडत असतील का? व्हिडिओच्या शेवटी ती कबरेची पूर्ण स्वच्छता करताना दिसते. पण लोकांना तिचं असं करणं आवडलं नाही. त्यांचं मत आहे की, अशा ठिकाणांसोबत अशी छेडछाड व्हायला नको.