तुम्हाला माहितेय का बायकांचं गॉसिप करणं म्हणजे एक सोशल स्किल आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 11:12 AM2017-10-09T11:12:28+5:302017-10-09T15:59:42+5:30

तुम्हाला माहितेय का, एका अभ्यासानुसार गॉसिपला एकप्रकारच्या सोशल स्किलचा दर्जा दिला गेलाय.

gossiping is a social skill- study | तुम्हाला माहितेय का बायकांचं गॉसिप करणं म्हणजे एक सोशल स्किल आहे

तुम्हाला माहितेय का बायकांचं गॉसिप करणं म्हणजे एक सोशल स्किल आहे

Next
ठळक मुद्देया बायका एवढं काय बोलतात हा समस्त पुरुष वर्गाला पडलेला मोठा प्रश्न आहेएखाद्या विषयाची अधिक माहिती ज्ञात असलेल्या स्त्रियांसोबत काही बायका गप्पा मारून आपल्या ज्ञानात भर करतात पुरुष फक्त दुसऱ्यांचा हेवा, इतरांचं यश, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष याच विषयावर पुरुष अधिक गप्पा मारतात. 

एकमेकींच्या कानात घुसून सतत काहीतरी गुजबुजत असणाऱ्या अनेक बायका आपण नेहमी पाहतो. ट्रेनमध्ये, रस्त्यावर चालताना, फोनवर, ऑफीसमध्ये याच्याशी-त्याच्याशी सतत या बायका काहीतरी बोलत असतात. या बायका एवढं काय बोलतात हा समस्त पुरुष वर्गाला पडलेला मोठा प्रश्न आहे. खरंतर पुरुषही एकमेकांशी गप्पा मारतात पण त्यांच्या गप्पांना आपण गॉसिप्स म्हणत नाही. मात्र बायका एकमेंकाशी कामाच्या बाबतीत बोलत राहिल्या तरी त्यांच्यात गॉसिप सुरू आहे, असाच समज आपण करून घेतो. शिवाय एकमेंकाची उणीदुणी काढण्यासाठी किंवा दुसऱ्यांना दुषणं देण्यासाठीच बायका गॉसिप करतात असा लोकांचा दृढ समज आहे. पण तुम्हाला माहितेय का, एका अभ्यासानुसार या गॉसिपला एकप्रकारचं सोशल स्किलचा दर्जा दिला गेलाय. उत्कृष्ट गॉसिप करणं हे सोशल स्किल असल्याचं या अभ्यासात म्हटलं गेलंय. 

कॅनडाच्या युनिर्व्हसिटी ऑफ ओटावामधील अॅडम डेव्हिस यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार गप्पा मारणं म्हणजेच गॉसिप करणं हे सामाजिक कौशल्य आहे. यामध्ये आपण कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकतो. त्यातही नातं, मैत्री, संसार या गोष्टींचा अधिक समावेश असतो. बायका जेव्हा गप्पा मारतात तेव्हा त्यांच्या गप्पांमधील विषय घरगुती किंवा सामाजिक असतो.अॅडम डेव्हिस यांचा गॉसिप विषयावरचा हा अभ्यास इव्हॉलिशनरी सायकोलॉजी सायन्स या मासिकात छापून आला आहे. या अभ्यासादरम्यान त्यांनी १७ ते ३० वयोगटातील कॅनाडियन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तया सर्वेक्षणाचा एक सविस्तर लेख मासिकात छापून आणला. या मासिकातील लेखानुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक गप्पा मारायला आवडतं. पण त्यांचे विषय फक्त घरगुती किंवा सांसारिक नसतात तर त्यांच्या विषयात सामाजिक समस्यांचाही समावेश असतो. त्याव्यतिरिक्त पुरुष फक्त दुसऱ्यांचा हेवा करण्यासाठीच गप्पा मारताना दिसतात. इतरांचं यश, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष याच विषयावर पुरुष अधिक गप्पा मारतात. 

या अभ्यासात स्त्रियांची एक डावी बाजुही नमुद केली आहे. इतरांपेक्षा मला किती सामाजिक ज्ञान आहे हे दाखवण्यासाठीही महिला गप्पा मारताना दिसतात. शिवाय एखाद्या विषयाची अधिक माहिती ज्ञात असलेल्या स्त्रियांसोबत काही बायका गप्पा मारून आपल्या ज्ञानात भर करतात आणि इतरांसमोर आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करतात असं हा अभ्यास म्हणतो. फक्त एकमेंकींना दुषणं देण्यासाठी महिला गॉसिप करतात असा एक समज प्रत्येकाच्या मनात असतो. मात्र या अभ्यासामुळे महिला सामाजिक विषयावरही गप्पा मारतात हे नव्याने सिध्द झालं आहे. कदाचित स्त्रियांचा शैक्षणिक स्तर उंचावत असल्यानेच असं झालं असेल असं म्हणायला काही हरकत नाही.

Web Title: gossiping is a social skill- study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला