तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयाच्या नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 06:42 PM2017-11-24T18:42:08+5:302017-11-24T18:58:20+5:30

त्याला लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे त्याने असा प्रयत्न करुन पाहीला.

Guinness World Record of lot of straws in the mouth on indian's name | तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयाच्या नावे

तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयाच्या नावे

Next
ठळक मुद्देया मुलाला आधीपासून वाटायचं की आपलं नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यावं.त्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आणि त्याला त्याच्या प्रयत्नात यश मिळालं.

ओडिशा - आपलं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यासाठी अनेकांकडून फार प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या युक्त्या आखून आणि वेगवेगळे कलागुण दाखवून वर्ल्ड रेकॉर्डसाठी दावा केला जातो. याचसाठी ओडिशाच्या पठ्ठ्याने हा कारनामा केला आहे. ओडिशातील मनोजकुमार महाराणा या पठ्ठ्याने आपल्या तोंडात ४५९ स्ट्रॉ ठेवूनगिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याला लहानपणापासूनच आपलं नाव नोंदवयाचं होतं म्हणून या त्याने तोंडात स्ट्रॉ ठेवून पराक्रम केला आहे. 

आणखी वाचा - अबब... २ किमीच्या पिझ्झाची गिनीजबुक मध्ये नोंद

मनोजकुमार हा अवघ्या २३ वर्षांचा तरुण आहे. त्याला लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. तोंडात स्ट्रॉ ठेवून रेकॉर्ड बनवणारे सिमोन एलमोरे यांची प्रेरणा घेऊन मनोजकुमारने हा रेकॉर्ड केला आहे. सिमोन एलमोरे यांनीही असाच रेकॉर्ड केला होता. सिमोन हे जर्मनीचे असून त्यांनी आपल्या तोंडात ४०० स्ट्रॉ ठेवून विश्वविक्रम केला होता. आणि आता मनोजकुमार याने तब्बल ४५९ स्ट्रॉ ठेवून सिमोन यांचा विक्रम मोडला असून नवा विश्वविक्रम केला आहे.  सिमोन नंतर मधल्या आठ वर्षात असा रेकॉर्ड कोणीही केलेला नाही. त्यामुळे मनोजकुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

आणखी वाचा - खिचडीला विक्रमाची फोडणी! कढई भरली ८00 किलोने; गिनीज बुकमध्ये झाली नोंद

वर्ल्ड रेकॉर्डसाठी काही नियम असतात, त्या नियमांनुसार आपल्या हातांचा आधार न घेता हे स्ट्रॉ १० सेकंद तोंडात ठेवावं लागतं. मनोजकुमारने शक्कल लढवून स्ट्रॉ एकत्र ठेवण्यासाठी त्याने स्ट्रॉ रबर बॅण्डने घट्ट बांधून ठेवले. त्यानंतर हळूहळू स्ट्रॉचा हा गुच्छा त्याने तोंडात टाकला. १० सेकंद हाताचा आधार न घेता ४५९ स्ट्रॉ तोंडात राहिल्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब त्याला मिळाला. या स्ट्रॉची जाडी ०.६४ सेमी. होती. 

आणखी वाचा - तरुणांनी साकारलेल्या सचिनच्या रांगोळीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या संस्थेकडून ही माहिती ट्वीटरवर देण्यात आली. त्यानंतर हा सगळ्यात विचित्र रेकॉर्ड असल्याचं काही नेटीझन्सने म्हटलं आहे. तर काहींनी मनोजकुमारचाही रेकॉर्ड तोडण्याची इच्छा व्यक्त केलीय. पण असे रेकॉर्ड करण्याआधी नेहमी खबरदारी घ्यायला हवी. मार्गदर्शकांच्या निगराणाखालीच अशी कृत्य करावी अन्यथा अशी कृत्य आपल्या जीवावर बेतू शकतात.

असे विविध रेकॉर्डस् वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Guinness World Record of lot of straws in the mouth on indian's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.