अरे बापरे! जपानमधल्या या माश्याचं वजन तब्बल २३०० किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 12:18 PM2017-12-08T12:18:55+5:302017-12-08T12:43:12+5:30
कितीही मोठा मासे खाणारा खवय्या असेल तरीही त्याने २३०० किलो वजनी मासा ना कधी खाल्ला असेल ना किती पाहिला असेल.
जपान : तुम्ही कधी हजार किलो वजनाचा मासा पाहिलाय का? किंवा हजार किलो वजनाचा मासा असतो यावर तुमचा विश्वास बसेल का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशा माशाविषयी सांगणार आहोत ज्याचं वजन तब्बल २३०० किलो आहे. झालात की नाही चकीत? या माशाविषयी काही गैरसमज होते, ते गैरसमज आता एका अभ्यासाद्वारे दूर करण्यात आले आहेत.
आणखी वाचा - डुकराच्या पोटातून मिळाला असा एक दगड ज्याची किंमत आहे कोटींच्या घरात
स्प्रिंगर या संकेतस्थळाने वृत्तानुसार, हा जगातील सगळ्यात वजनी मासा १९९६ साली जपानच्या एका समुद्रात सापडला होता. या माशाचं वजन २३०० किलो असून २.७२ मीटरचा हा मासा आहे. त्यावेळी हा मोला सनफिश असून मोला मोला या प्रजातीतील असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सगळ्यात वजनी मासा म्हणून या माशाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली होती. मोला मोला या प्रजातीतील मासा म्हणूनच या माशाची गिनीज वर्ल्डमध्ये नोंद झाली होती. मात्र या माशाचा एक नवीन अभ्यास समोर आला आहे. हा मासा वेगळ्याच जातीतला असल्याचा संशय आल्याने यावर सखोल अभ्यास करण्यात आला. हिरोशिमा युनिर्व्हिसिटीच्या या विभागाने या माशावर अभ्यास करून नुकतीच एक माहिती प्रकाशित केली आहे. या माहितीद्वारे या माशाला बोनी फिश म्हणत असून हा मासा मोला अलेक्संड्रिनी या प्रजातीतील असल्याचं सांगण्यात आलं आहं. या माशाविषयीचा हा सगळा अभ्यास एका रिसर्च मासिकात प्रसिद्ध झालाय. हा मासा सापडल्यानंतर तो नक्की कोणत्या प्रजातीतील आहे, याचा अभ्यास करण्यासाठी हिरोशिमा युनिर्व्हिसिटीतील विभागाने जवळपास जगभरातील एक हजारापेक्षा जास्त पुरावे तपासले. त्यातील काही पुरावे हे पाचशे वर्षांपूर्वीचे होते.
अशाच इतर जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा
(फोटो - प्रातिनिधीक)
या माशाचं वैशिष्ट्य म्हणजे, या माशांची खवलं ही इतर माश्यांसारखी बनलेली नसून हाडांपासून बनलेली दिसतात. शार्क आणि रेस माशांचीही खवलं हाडांपासून बनलेली असतात. त्याचप्रमाणे जगातील हा सगळ्यात वजनी मासा असला तरीही महासागराच्या खोल तळाशी आणखी वजनी मासे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २००४ सालीही एका संशोधकाला या प्रजातीतील मासा सापडला होता. मात्र तो मासा इतका वजनी नव्हता. या जातीतील माशांचे वजन दोन हजार किलोपेक्षाही जास्त असतं. त्यामुळे हा मासा पहिल्यांदाच दिसला असला तरीही याप्रकारचे अनेक मासे समुद्राच्या तळाशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.