चहावाल्याची चहा बनवण्याची हटके स्टाईल नेटकऱ्यांमध्ये व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:24 PM2017-10-03T15:24:51+5:302017-10-03T16:03:09+5:30

एका चहावाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाला आहे. चहा बनवण्याची ही नवी पद्धत पाहून अनेकांना हसू आवरलं नाही तर काहींच्या भूवया उंचावल्या.

Viral in the style of tea making tea products | चहावाल्याची चहा बनवण्याची हटके स्टाईल नेटकऱ्यांमध्ये व्हायरल

चहावाल्याची चहा बनवण्याची हटके स्टाईल नेटकऱ्यांमध्ये व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देचहा म्हणजे प्रत्येकाचा जीव की प्राण. कधी झोप उडवण्यासाठी तर कधी सहज टाईमपास म्हणून लोकं चहा पित असतात. हा व्हिडीओ पाहताना सुरुवातीला आपल्याला वाटतं की, याला कोणी झपाटलं आहे की काय. मात्र हा प्रकार जरा वेगळा आहे. या ‘चायवाल्या’ला या व्हिडीओमुळे प्रसिद्धी मिळाली आहे. काहीही म्हणा आपल्या देशात चहावाल्यांचं नशिब कधी आणि कसं फळफळेल याचा काही नेम नाही. 

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. व्हायरल गोष्टींमुळे कोणाला कधी प्रसिद्धी मिळेल याचाही पत्ता नाही. आता तुम्ही हा व्हिडीओ बघा ना. चहा म्हणजे प्रत्येकाचा जीव की प्राण. कधी झोप उडवण्यासाठी तर कधी सहज टाईमपास म्हणून लोकं चहा पित असतात. कोणत्याही नाक्यावरच्या कोपऱ्यावर एकतरी चहावाला दिसतोच आणि त्याच्या अवती-भवती उभे राहून चहा पिणारेही दिसतात.

पाहा हा व्हिडीओ -

असाच एका चहावाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाला आहे. चहा बनवण्याची ही नवी पद्धत पाहून अनेकांना हसू आवरलं नाही तर काहींच्या भूवया उंचावल्या. मान्य! , प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत वेगळी असते मान्य पण या व्हिडीओमधील पद्धत फारच वेगळी आणि हटके आहे. अगदी विलक्षण आहे. त्या चहावाल्याला त्याच्या बाजूला उभे असलेले त्याचे ‘चाहतेही’ प्रोत्साहन देताना दिसतात. हा व्हिडीओ पाहताना सुरुवातीला आपल्याला वाटतं की, याला कोणी झपाटलं आहे की काय. मात्र हा प्रकार जरा वेगळा आहे. लोकांच्या मनोरंजनासाठीच तो असं करत असल्याचं आपल्याला नंतर-नंतर जाणवतं. चहा बनवता बनवताच तो इतरांना चहा पिण्यासाठी आग्रह करताना दिसतो. त्याचा हा प्रकार बघत शेजारी उभे असलेले हसून हसून लोटपोट होतात. खरंतर हा व्हिडीओ फार जुना आहे, मात्र पुन्हा तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या ‘चायवाल्या’ला पुन्हा प्रसिद्धी मिळाली आहे. काहीही म्हणा आपल्या देशात चहावाल्यांचं नशिब कधी आणि कसं फळफळेल याचा काही नेम नाही. 

Web Title: Viral in the style of tea making tea products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.