कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा एकनाथ शिंदे यांन पाठिंबा, सर्वच चकित! आली उद्धव सेनेची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:13 IST2026-01-21T17:11:17+5:302026-01-21T17:13:04+5:30

खरे तर, अनेक वर्षांच्या कटुतेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती झालेली होती. दोन्ही पक्षांनी महानगरपालिका निवडणुका सोबतीने लढल्या. मात्र, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

MNS's support for Eknath Shinde in Kalyan-Dombivli Municipal Corporation, everyone is surprised Uddhav Sena's first reaction | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा एकनाथ शिंदे यांन पाठिंबा, सर्वच चकित! आली उद्धव सेनेची पहिली प्रतिक्रिया

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा एकनाथ शिंदे यांन पाठिंबा, सर्वच चकित! आली उद्धव सेनेची पहिली प्रतिक्रिया

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर निवडीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एक निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर, अनेक वर्षांच्या कटुतेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती झालेली होती. दोन्ही पक्षांनी महानगरपालिका निवडणुका सोबतीने लढल्या. मात्र, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

"आमचा पक्ष शिवसेना (यूबीटी) आहे आणि सर्व निर्णय... -
यासंपूर्ण प्रकरणावर आता उद्धव सेनेची पहिली पण सावध प्रतिक्रिया आली आहे. यासंदर्भात बोलताना, उद्धव सेनेचे नेते अनिल परब म्हणाले, "मी केवळ माझ्या पक्षासंदर्भात बोलू शकतो. दुसरा पक्ष काय निर्णय घेतो, यावर मी भाष्य करू शकत नाही. आमचा पक्ष शिवसेना (यूबीटी) आहे आणि सर्व निर्णय उद्धव ठाकरे घेतील."

असं आहे महापौर पदाचं गणित - 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकूण १२२ जागा आहे. यामुळे बहुमतासाठी ६२ जागांची गरज आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरली आहे, मात्र सत्ता स्थापनेसाठी त्यांना आणखी १० नगरसेवकांची आवश्यकता आहे.

मनसेने या निवडणुकीत ५ जागा जिंकल्या आहेत. राज ठाकरेंच्या या पाच नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास शिंदेंच्या शिवसेनेचा आकडा ५७ वर पोहोचतो. मात्र, यानंतरही त्यांना आणखी ५ नगरसेवकांची गरज आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आता शिंदे सेनेकडून या ५ जागांसाठी इतर पक्षांच्या नगरसेवकांशी संपर्क सांधला जात आहे. 
 

Web Title : कल्याण-डोंबिवली में मनसे का शिंदे को समर्थन, चौंकाने वाला कदम; उद्धव सेना की प्रतिक्रिया।

Web Summary : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका चुनाव में राज ठाकरे की मनसे ने एकनाथ शिंदे की शिवसेना का समर्थन किया, जिससे कई लोग हैरान हैं। उद्धव सेना ने सावधानीपूर्वक प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि फैसले उद्धव ठाकरे लेंगे। शिंदे की सेना को बहुमत के लिए और पार्षदों की जरूरत है।

Web Title : MNS supports Shinde in Kalyan-Dombivli, shocking move; Uddhav Sena reacts.

Web Summary : Raj Thackeray's MNS supports Eknath Shinde's Shiv Sena in Kalyan-Dombivli municipal elections, surprising many. Uddhav Sena cautiously reacts, stating decisions are up to Uddhav Thackeray. Shinde's Sena needs more corporators for majority.